Selections from the Peshwa Daftar 29.18: [27-10-1761] Balaji Govind to Dadasaheb, complaining that the Raja of Jaipur has not paid him any remuneration and requesting him to send some money.
Selections from the Peshwa Daftar 29.18
- Language
- Marathi
29.18
छ २७ राखर इसने
श्री
पु॥ श्रीमंत राजश्री दादासाहेब
स्वामी साहेबांचे सेवेसी
विज्ञापना ऐसिजे. सेवकासी राजियांकडूनहि रोजमरा मिळत नाहीं. याकरितां स्वामीसहि वारंवार विनंती दोनच्यारदां लिहिली; परंतु येकदा तो आज्ञा पावली की तिकडे राजश्री मल्हारजी होळकर आहेत त्याजला लिहिणें. ते थोडी बहुत बेगमी करणें ते करतील. तेथोन ऐवज पाठवावया * सुरक्षित पोहचणार नाहीं. अगर अगत्य अगत्य खर्चापुरते * दोनशे मेलऊन मजला इकडे देविले तर सरकारातून * * * कोणी सावकार मिलत * (पत्राचा पुढील भाग फाटून गहाळ झाला आहे. त्यानंतर पत्राचे पाठीमागील मजकूर.)
* * याकरिता विनंती * * * सेवकांचा निर्वाह लस्कर * * * स्वामी खावंद आहेत. सेवकांचा प्रतिपाल करणार साहेब समर्थ आहेत. कासिदांच्या जोड्या स्वामीजवळ जातात त्याजला दिवसगत लागते. विनंती की लवकर जाब सरकारातून जाहलियां सेवकासी तिकडील खबरदारी राहत जाईल. सर्व प्रकारे प्रतिपाल करणार स्वामी साहेब समर्थ आहेत. बहुत काये लिहिणें, कृपा केली पाहिजे हे विज्ञापना.