Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.19: [27-10-1761] Balaji Govind to Dadasaheb, informing him that Madhosing has deputed Daulatsing to Najibkhan to confer with the son of the Emperor.

Selections from the Peshwa Daftar 29.19

Language
Marathi

29.19

छ २७ राखर इसने

श्रीशंकर

पु॥ श्रीमंत राजश्री दादासाहेब

स्वामी साहेबांचे सेवेसी

विज्ञापना ऐसीजे. राजे माधोसिंग यानी दवलतसिंग छत्रभुजोत याजसमागमे सरंजाम देऊन बादशाहजाद्यासी बोलावयाकरितां नजीबखानाजवळ पाठविलें. तो जाऊन दिलीस पावला. नजीबखानासी भेटी जाली. * प्रहरपावतो येकांत केला. तदनंतर तोरें २ व रक्रम जवाहिर १ दवलतसिंगासी दिली व समागमचे लोकांसी तोरे दिले. हा कालपावेता * जाणतच आहेत. बादशाहाचे घरांत काही बाकी * * * * गोष्टी तो बसले. ठिकाणी कांही—(यापुढील पत्राचा भाग फाटून गहाळ झाला आहे.)