Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.3: [11-6-1761?] Gundo Kashi reports to Dadasaheb the confiscation by Mahadaji Narayan of the Patilki rights belonging to Nimbabai Sindia, wife of Ranoji. Both this lady and Chimabai, Mahadji's mother, are alive after Panipat.

Selections from the Peshwa Daftar 29.3

Language
Marathi

29.3

श्री

श्रीमंत माहाराज राजश्री दादासाहेब

स्वामीचें सेवेसी

विनंती सेवक आज्ञाधारक गुंडो कासी मु॥ श्रीगोंदे चरणावर मस्तक ठेऊन सा॥ नमस्कार विज्ञाति. येथील वर्तमान ता॥ छ ७ माहे जिल्कादपावतों साहेबाच्या कृपावलोकणेकरून यथास्थित असें विशष. निबाबाई सिंदे याजकडॆं मौजे अरणगाव दलवी याचें व हिवरें वगैरे दाहा बारा गौची मामलेयती व पाटिलक्या वगैरे होत्या. त्या गावाची जफती राजश्री नारो बापुजी यांचे पुत्र माहादाजी नारायेण यानी केली. सिंदे मजकूर याचे अमलदार व पागा गाव परगावच्या उठोन आल्या. सेवेसी श्रुत्ये होये. श्रीगोंदियात निंबाबाई सिंदे व बळवंतराव गोपाल व पोतनीस व बक्षी व मुजुमदार वगैरे कोन्ही मातबर कुलें होतीं. त्यानी येवज व चांगली घोडी व वस्तभाव मातबर यैसी रोज दररोज लांबवीत आहेत. येथे ठेवीत नाहींत. येथील धर सुटला आहे. भयचकीत जाली आहेत. जेथे ऐवज तेथें भये आहे यैसे जाणून यैवज जिकडील तिकडे लांबवितात. सेवेसी श्रुत्य होये हे विज्ञापना.