Selections from the Peshwa Daftar 29.22.6
Selections from the Peshwa Daftar 29.22.6
- Language
- Marathi
29.22.6
४140 मल्हारजी होळकर याचे लष्करांत स्वामीचे कृपेकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असें विशेष. राजश्री गणेश संभाजीकडे मामलत आज दोन वर्षे जालीं त्यापासून फडनिशीचें काम येकंदर न घेतलें. येविषयी दोनच्यार विनंतीपत्रीं सविस्तर वर्तमान लिहोन पाठविलें त्यावरून विदित जाहालेंच असेल. ऐसास राजश्री बाबूराव कोन्हेरा यांनीं झांशीचा किल्ला हवाला केल्यावर केवळच बदमामलीवर नजर देऊन झांशी शहरापासून येक लाख तीस हजार दंड घेतला व आणखी गांवांतील राजश्री केशवराव हरकारे यांचा पुत्र वगैरे दक्षिणी ग्रहस्त बावन सामी लिहोन कैद करून दंड घ्यावा ऐसा विचार केला. राजश्री माधवराव व्यंकटेश याकडे नारो शंकर याणी झांशी संस्थानच्या सनदा पाठविल्या त्या मशारनिलेंनीं दाखविल्या. परंतु अमल न दिल्हा. उलटें गांवांतून काढून दिल्हा. सुज्यातदौलाकड़े गोसावी याचे विद्यमानें चाकरीचें सूत्र लाऊन वकील पाठऊन ठीक केलें. सेवक सरकारांत विनंतीपत्रे लिहितो हें वर्तमान पुण्याहून मशारनिलेचा वकील सदाशिव बल्लाळ व त्याचा भाऊ गोपाळ संभाजी यांणीं लिहोन पाठविलें त्यावरून सेवकांस कैद करावें असा विचार योजिला. तेव्हां येकायेकींच गणेश संभाजी बडेगाव नजीक झांशी दोन कोस येथें होता व सेवक झांशीस होता तेथून भाद्रपद वद्य द्वादशीस सर्व वस्तभाव व कागदपत्र सोडून कारकून न ठेवतां निघोन लांब लांब मजली करून नरवरावरून शिरोंजेस आलो. पुढें सोबत पाहून वरकड घांट बंद, याकरितां इंदूरचे वाटेनें आलों तों सेंधव याचा घाट राजश्री मल्हारजी होळकर यांणीं बंद केला. याकरितां इंदूराहून येक मजल कूच करून उजनीचे वाटेवर सुभेदाराचा मुकाम होता तेथें भेट घेऊन सविस्तर वर्तमान विदित केलें. इताकियांत सुभेदारास स्वामीचें पत्र आलें कीं तुम्ही हुजूर येणें.