Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.22.7

Selections from the Peshwa Daftar 29.22.7

Language
Marathi

29.22.7

त्यास राजे माधोसिंग यांणीं नेणव्यास मोर्चे लाऊन माळव्यांतील अंमल उठवावा म्हणोन फौजसुद्धां चमेलीवर आला. त्याचें पारपत्य न करावें तरी माळवा राहाणार नाहीं. याकरितां सुभेदार दरमजल कूच करून येथें आले. पुढें राजश्री गंगाधर यशवंत सडे फौजेनिशी रवाना केले आहेत. आठा पंधरा दिवसांत राजे माधोसिंग माघारां जैनगरास गेला तरी उत्तम, नाहीं तरी युद्धप्रसंग होईल. परंतु यापाशीं फौज थोडी आहे. देशीं लोक नालबंदी घेऊन गेले ते आले नाहींत. शिंद्याकडील खानाजी जाधव वगैरे दोन हजार आहेत ते उजनीस आहेत, अद्यापवर पोहोंचले नाहींत. लौकर फौज येऊन पाहोंचत्ये तरी उत्तम आहे. बिजेसिंग व कोठेवाले व बुंदीवाले याचे वकील (आले) आहेत. येक सुभेदाराची हिंमत व स्वामीच्या पुण्यप्रतापेंकरून शत्रूचा पराभव होईल. माधोसिंग उन्हेलावर होता. तेथून कांहीं फौज नेणव्यास व केशवराव पाटणे येथें ठेऊन आपण दोन मजला मार्गे जैनगरच्या रोखें गेला म्हणोन वर्तमान आलें आहे. ईश्वर सर्व उतमच करील. गणेश संभाजीनें सरकारआज्ञा न मानून बुंदेल्यांशीं बिघाड केला व झांशीस येऊन बोंडसे दतियावाले वगैरे यांशीं बिघाड केला आहे आणि सुज्यातदौलाकडे चाकरी ठीक केली. शाहा आलम पातशाहाचे परवाने आणिले. कागदीपत्रीं गणेशराव बाहादर लिहितात. केवल यैवनमये जाले. सेवक निघोन आल्यावर राजश्री केशवराव हरकारे यांचा पुत्र बद्रीनाथराव यांस कैद केलें. तीन लाख रुपये मागत आहे. आपलें घरीं बोलावून बसविला. दोन दिवस अन्न खादले नव्हतें. तिसरें दिवशीं भोजन कैदेतच केलें. रुपयाचा ठराव जाहला नव्हता, सर्वस्व घेऊन मला जाऊं देणें ऐसें म्हणत होता म्हणोन मशारनिलेचें पत्र सुभेदारास घेऊन काशीद आला तो जबानी सांगत होता व पत्रीं लिहिलें आहे. येविषयीं बद्रीनाथराव याचें पत्र स्वामीसहि आलेंच असेल.