Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.23: [17-11-1761] Badrinath Keshav sends news from the North and speaks of the activities of the various potentates-Najibkhan, Shuja-ud-daula and others.

Selections from the Peshwa Daftar 29.23

Language
Marathi

29.23

पौ छ ३० साबान इसने

श्री

श्रीमंत माहाराज राजश्री पंत प्रधान

माधवराव स्वामीचे सेवेसी

पोष्‍य राव बदरीनाथ केशव साष्टांग नमस्कार विनंती. येथील क्षेम तागाईत १९ माहे रविलाखर जाणून स्वानंदलेखन आज्ञा कीजे. विशेष. आपलें कृपापत्र सविस्तर पावलें, लेखनार्थ कळों आला. दक्षscreenणचें कामकाज जाल्यावर फौजा हिंदुस्थानास रवाना होतील. ऐशियास हाहि विचार उत्तमच आहे. आतां कां(हीं) तिकडील निवाडा होण्यास विलंब लागणार नाहीं. आजपावेतों कामकाज सिद्धीतें पावलें असेल, फौजा रवाणा जाल्या असतील. इकडे फौजेचें येणें आगत्यच आहे. दाहा पंधरा (हजार) फौज झांशीपावेतों येऊन पावली तर आवाईनें काम बहुत होईल. राजश्री मल्हारराव सुभेदार यांस माधोसिंगाकडीलहि काम आगत्यच आहे. पूर्वपश्चिमचें अंतर आहे. दोहीकडील काम सांभाळलें पाहिजे. पातशाहा आजपावेतों जाजमऊजवळ होते, आतां कूच केलें. काळपीजवळ उतरणार, दिलीकडे जाणार हे वदंता आहे. सुजाउद्दौलानें सर्व आपली सामोग्री लखनौतून काहाडली, प्रयागचे किलियांत नेऊन ठेविली. आपण समागमें पातशाहाचें दिलीस जाणार. दिलीचे हवेलीची तयारी त्याणें करविली आहे, व नजीबखान दिलींत होता तो कूच करून हिसार प्रांती बंदो(बस्ती करावयास) गेला. जाटासी त्यासी सुलेहचा जाबसाल * * * * प्रसंग कांहीं दिसत नाहीं. नजिब [पुढील सुमार तीन ओळी फाटल्या आहेत] तालुका आपलें स्वाधीन करून घ्यावा. दर * * दालीचें चापर म्हणजे सजावले राजे नागरिमल * * आले आहेत. सुरजमल जाटाची मामलत व * * * ची मामलतेचा पैका मागावयास आले आहेत. * * * * * * जे नागरमल दिलीहून जाबसालाकारणें जाटाजवळ येणार आहेत. चापर बोलत आहेत कीं, अबदालीची फौज पिशावरेपावेतों पावली, सिखांहीं लाहोर प्रांतीं हंगामा केला आहे. त्या (पार)पत्याकारणें येणार व जाटानें पैका न पाठविला तर माघमासपावेतों आपण शाहा येणार आहे. सत्य मिथ्य तेच जाणेत. कळलें वर्तमान आपले सेवेसी विनंती केलें असें. आमचें वर्तमान तर आम्ही कोठवर लिहावें? परस्परें महाराजांसीं विदित जालें असेल. आम्ही सविस्तर चिरंजीव राजश्री राव मुकुंदराव आमचे बंधु देशीं आहेत ते सविस्तर सेवेसी विनंती करितील. * * वा तर आपलें राज्यांत आजपावेतों नीत, व मर्यादा व धर्मन्याय व दया व प्रजापालन व दुसऱ्याचें दुख ऐकणें व त्याचें पारपत्य तात्काळ करणें यथास्थित आहे. येणेंकरून जय व प्रताप विशेष आहे, व पुढेंहि होईल. येथें अविचार कर्म केलें परिणाम न विचारला. शासन व नीत महाराजाची विस्मरण करून अल्पबुद्धीनें करणें तें केलें. सर्व प्रकारें आपण न्यायें निष्ठुर व शासने व नियंते आहेत, मुलाजा कोणाची करणार नाहींत. विशेष काय ल्याहावें हे विनंती.

[१ तगीरी, बडतर्फी.]

Discussed in (1)