Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.24: [17-11-1761] Badrinath Keshav draws a graphic picture of the North after the Panipat disaster had banished Maratha influence for the time being. With the Sikhs in revolt the Abdali had no peace in the Punjab and was pressing for some sort of understanding with the Marathas. Shuja-ud-daula had occupied Prayag and

Selections from the Peshwa Daftar 29.24

Language
Marathi

29.24

पो छ ३० साबाम इसने

श्रीकृष्णोजयती

श्रीमंत माहाराज राजेश्री

रघुनाथरावजी दादा स्वामींचे सेवेसी

पोष्य राव बदरीनाथ केशव साष्टांग नमस्कार विनंती. येथील क्षेम तागायत छ १९ माहे रविलाखर जाणून स्वानंदलेखनआज्ञा केली पाहिजे विशेष. माहाराजाचें कृपापत्र छ २९ मोहरमचें पावलें. लेखनार्थ कलों आला कीं, सातारियास जाऊन पेशवाईचीं वस्त्रं व हस्ती घोडे सिरपेच व तुरा मोत्याचा व पथक व तलवार व ढाल व बाजे बहुमान पेशवाईचे पदाचे श्रीमंत माधोरावजीस देवऊन तेथून पुण्यास स्वारी येऊन फौज लक्ष जमा केली. बंदोबस्त करून हिंदुस्थाना(स) ये(ऊ) ऐशियास महाराज प्रतापवान आहेत. वडील पूज्य सर्वास आहे. येथायोग्य होतें तें केलें. सामोग्री विपुळ घरची सिधच आहे. आपल्या तपोतेजेंकरून सर्व पादाक्रांत होतील. आल्पबुधींनें वर्तनूक ज्याने केली असेल त्यास सिक्षा त्वरीतच होईल. आपले आपुनच सर्व लयातें पावतील. माहाराजाचे सर्व करतलामल आहे. आपला पराक्रम व दर्प सर्वास बरें प्रकारें विदित आहे. आबदालीसहि आपलेंच भय विशेष आहे. त्यानें येकदां आपले तेज अनुभविलें आहे कीं, आटकपावेतों त्याचा उच्छेद केला होता. त्या भयास्तव आतां वरच्यावर याकूब अलीखानास पत्रें पाठवीत आहे कीं, हरप्रकारें सलुक करून सरहद मुकरर करणे * * * कांहीं होणार नाहीं. यसैं * * * इकडील वर्तमान तर * * * मऊ जवळ फार दिवस सुजाउद्दौलानें आपलीं मुलें मानंसें व खजिना वगैरे सरंजाम * * * मुनका (?) बांधून श्रीप्रयागाचे किल्यात पा * * * घेणे तो घेतला. आतां पातशहास व * * * यास्तव तेथील हवेलीचीहि तयारी करविली आहे. कोणत्या घांटी उतरतील तें पाहावें. जमिदाराचे मनांत कीं, काल्पीच्या घांटें उतरून बुंदेलखंडांत आपला आमल बसोन दिलीस जावें. पाहावें काये ठहरतें. दिलीहून नजिबखानानेंहि कूच करून बंदोबस्ताकारणें हिसार प्रांती गेला. त्याणे वकील अबदालीकडे पाठवणें मुकरर केलें आहे कीं, त्याजपासोन लाहोरची सुबेदारी व सिरहंदचा तालुका आपले स्वाधीन करून घ्यावा. परंतु प्रस्तुत अबदालीचे चपर म्हणजे सजावल राजे नागरमळाजवळ दीलीस आले आहेत. सुरजमलाची मामलत व गाजुदीखानाची मामलतेचा पैका मागावयास आले आहेत.

4145 यास्तव राजे नागरमल दिलीहून जाबसालाकारणें जाटाजवळ येणार आहेत. चापर म्हणत आहेत कीं, आबदालीची फौज पशावरेपावेतों, सिखांही लाहोर प्रांतीं हगामा केला आहे त्याचे पारपत्यास जाणार व जाटानें पैका न पाठविला तर माघ मासीं आपणच शाहादाखल होईल. सत्य मिथ्य तेच जाणेत. कळलें वर्तमान आपलें सेवेसीं विनंती केले असे. झांसीचें व आमचे वर्तमान तर परस्परें माहाराजास विदित जाले असेल. चिरंजीव राजश्री राव मुकुंदरावजी आमचे बंधू देशीं आहेत ते सविस्तर सेवेसी विनंति करतील, आम्हीं काय ल्याहावें. आपले राज्यांत आजपावेतों नीत व मर्यादा व धर्म व न्याय व दया व प्रजापालन व परदुःख येकणे व त्याचें पारपत्य तात्काळ करणें यथास्थित आहे. येणेंकरून जय व विपुल प्रताप आहे व पुढेंहि वृध होईल. येथें आविचारित कर्म केलें परिणाम न विचारला. शासन व नीत माहाराजाची विस्मरण करून अल्पबुद्धीनें क्षुलक कर्म करूं नये तें केलें असो. * * * येकनिष्ठ व शास्ते व नियंते आहेत. मुला * * * * करतील. विशेष काय लिहावे. हे विज्ञापना.