Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.25: [22-11-1761] Trimbak Vishvanath to Vishvasrao Lakshman stating that the riots in Bundelkhand make it impossible for him to realise revenue from the district.

Selections from the Peshwa Daftar 29.25

Language
Marathi

29.25

पो छ २४ रबिलाखर

श्री

श्रीमंत राजश्री रावसाहेब

स्वामींचे सेवेसी

आज्ञांकित त्रिंबक विश्वनाथ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी. येथील क्षेम तागाईत छ २४ माहे रबिलाकर जाणोन स्वकुशल लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे विशेष. इकडील वर्तमान तों हा कालवर बुंधेल्यांची दुंडी मिटत नाहीं आणि पोत्यांचें काम चालू होत नाहीं. सेवेसीं विनंती दाहापांचदां केली परंतु ब्राम्हगुव्यास स्वार राहिल्यानें बंदोबस्त होईल तर स्वारांची रवानगी

4146 करावी. जलद आलिया पुढें उन्हाारीची जोतपातें होईल. नाहीं तर उन्हाारी पडेल, यास्तव वारंवार पत्र लिहितो तर राजश्री बालाजी गोविंद यांची रवानगी जलद करावी आणि ब्राम्हणुव्यास राहिलें म्हणजे बंदोबस्त होईल, नाहीं तर होणार नाहीं. मौजे बिंझारे येथील महतिया जिवें मारून टाकला. च्यार माणसें मारलीं गेलीं, याप्रमाणें बुंधेले हरामखोरी करितात. सेवेसी विनंती श्रुत होय हे विज्ञप्ति.