Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.26: [26-12-1761 ?] The writer one Ramchandra Daroge informs Vishvasrao Lakshman that he has interviewed Bhausaheb (the pretender) and will accompany him as far as Mahumohani.

Selections from the Peshwa Daftar 29.26

Language
Marathi

29.26

पौ छ १ जमादिलाखर

श्री

श्रीमंत राजश्री रावसाहेब साहेबाचे सेवेसी

आज्ञाधारक रामचंद्र दरोगे व पुंजाजी कृतानेक सां नमस्कार आण सां दंडवत विनंती विज्ञापना. सेवक लोकांचें वर्तमान ताा छ २८ जोवल मु॥ दभुवा साहेबाचे प्रतापेकरून यथास्थित असे विशेष. साहेबाची आज्ञा घेऊन स्वार जालो ते छ मजकुरी लस्करदाखल जालो. राजश्री भाऊची भेट जाली. उपरांतिक खासबरदार आा वीस तोफा बरोबर दिल्हे. त्यापैकी पाच आसामी ठेऊन घेतल्या. बाकी पंधरा आसामी याची रवानगी केली. ते सेवेत येऊन पोहोचतील. उदईक कूच करून महूमोहनीस राजश्री भाऊ जाणार. आम्हीहि समागमेच असो. सेवेसी श्रुत होये. विशेष काये लिहिणे हे विज्ञापना.