Selections from the Peshwa Daftar 29.27: [Recd. 30-12-1761] Dhansing informs the Peshwa that Malharrao Holkar after combining his forces with those of the Chief of Kotah has crushed the army of Jaipur which had crossed the river Chambal.
Selections from the Peshwa Daftar 29.27
- Language
- Marathi
29.27
छ ३ जमखर
श्री
श्रीमंत राजश्री राऊसाहेब
पंत प्रधान स्वामीचे सेवेसी
सेवक आज्ञाधारक धनसिंग साष्टांग दंडवत विज्ञापणा येसी जे. सेवकास मारवाड प्रांतीं राजा बिजेसिंगाकडे पाठविलें होतें तेथें जाऊन श्रीमंत कैलासवासी- जीची आज्ञाप्रमाणें जाबसाल केला. उंटाची फरमाविसविसीं सांगितलें. ते सर्व तजवीज त्याणी केली होती. इतकियांत श्रीमंत कैलासवासीजीचें वर्तमान आलियावर ते सर्व तजवीज मोकुफ जाली. आम्हास व राजश्री गोविंदराम महतास आपलाकडोन वकील यैसे रवाना केले ते उजेनीस आले. ते येक तर मार्ग बंद चालत नाहीं. दुसरे सरिरास बरें वाटत नाहीं. खर्चाची विपत विशेष आहे. येथें कोन्ही वलखीचा नाहीं की कर्जवाम देईल. सर्व भरंवसा स्वामीचे पायांचा आहे. त्यासी कृपाळु होऊन कांही खर्चास पाठविनार स्वामी धनी समर्थ जाहेत. नाहीं तर येथील कमाविसदारास येक आज्ञापत्र सेवकाचे विसईं साद्र होये कीं आम्हांस खर्चास देऊन स्वामीचे सेवेसी पावते करून देणें, यैसें आज्ञापत्र साद्र केलें पाहिजे. यानंतर राजकी वर्तमान यैसे जे राजश्री मल्हारराव सुभेदार दरकूच कोट्यास जाऊन कोटेकऱ्याची फौज समागमे घेऊन कछवायेची फौज चमल उतरून आली होती त्यासी जाऊन बुडविली. राजसिंग घोडचड्या जखमी होऊन व पळाली फौज यैसे खोपरास जाऊन लपाली आहे. मागें राजश्री सुभेदारहि जाऊन खोपरास लागले आहेत लोकांचे कर्जाखाले फसून राहिलों आहों. त्यासी कृपालु होऊन खर्चाचा प्रमृश करनार स्वामी धणी समर्थ आहेत. बहुत काय लिहिणें हे विज्ञापना.
[१ लावणी, मशागत.]
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English