Selections from the Peshwa Daftar 29.29: [1761-62] The writer advises that the danger arising from the Jat's attitude has taken an aggravated form and must be dealt with firmly and immediately.
Selections from the Peshwa Daftar 29.29
- Language
- Marathi
29.29
(पहिला बंद गहाळ)
पडोन संकोच्याते पावले येदर्थी संदेह नाही. खासा स्वारी देशास गेली. सरदार इंदूर उजन प्रांती राहिले. राजश्री विठलराऊ सिवदेव ग्वालेरीहून देशास गेले. इकडे मातबर फौज नाही. सुने रान पाहून जाटाने पाय पसरोन सर्व आकर्षण करून केवळ आरूढ जाला आहे. जैनगरवाल्यास व विजेसिंग यांस लेहून पाठविले कीं दक्षणिया * * मुलुक सर्व घेतला तमाम ठाणी उठविली. तुम्ही उजनप्रांत जफ्त करणे तोपर्यंत आम्ही इकडून बंदोबस्त करीत येत असो येसे प्रकार जाटाने योजिले आहेत. त्याच शत्रुने येखादे मातबर स्थल हस्तगत करून घेतल्या येणे कठीण पडेल. आम्ही श्रीमंतास व सरदारास पत्रावरी पत्रे पाठवीत गेलो परंतु आद्याप फौजेचे आगमन दिसत नाही. बरसातीकरिता आनमान किंवा काये मनसबा आसेल तो न कले. येथील प्रसंग तो लिहिता येत नाहीं. आम्ही साहेबकामास प्राणसंकल्प केले आहेत. तथापि उपराळा जाला पाहिजे. येसियास आपणहि मुजरत सरदाराकडे व श्रीमंताकडे पत्रे पाठऊन ताबडतोब फौज येऊन पोहोचे ते करावे. मुख्य गोष्ट श्रीमंत स्वामीचे कल्याण आसल्या सर्वांस * * * झासी करेरा लहान जागा नाहीं. मालव्यातील मोठा नाका आहे. हा राहिल्या अमित्र पुढे येऊन पावणार नाही. याजकरिता इकडील साहित्य होऊन बंदोबस्त राहे ते करावे श्रीमंतास तपसीलवार लेहून इकडे फौज सत्वर येई ते करावे. बहुत काय लिहिणे लोभ कीजे. सदैव पत्र पाठवीत आसावे हे विनंती.