Selections from the Peshwa Daftar 29.4: [23-6-1761] Gundo Kashi, who appears to be an informant, suggests that the estates of one Shivba Shenvi, Sindia's Bakshi, be confiscated as he was killed at Panipat and has left no male-issue. The writer refers to the presence of Jankoji Sindia near Panipat—as mentioned in a letter to Nimbabai by Chintopant.
Selections from the Peshwa Daftar 29.4
- Language
- Marathi
29.4
छ १३ जिल्काद
श्री
श्रीमंत माहाराज राजश्री दादासाहेब
स्वामीचे सेवेसी
विनंती सेवक आज्ञाधारक गुंडो कासी मु॥ श्रीगोंदे चरणावर मस्तक ठेऊन सा नमस्कार विज्ञाति. येथील वर्तमान ता छ १९ माहे जिल्कादपावेतों साहेबाच्या कृपावलोकणेकरून यथास्थित असे विशेष. राजश्री जनकोजी सिंदे याचा बक्षी सिऊबा सेनवाई हा हिंदुस्थानचे लढाईंत मयेत जाला. त्याजला पुत्र संतान नाही. येक कन्या मात्र आहे. तिचा भ्रतार सिऊबाचे घरी आहे, व सिऊबाची स्त्री यैसी आहेत. घरात द्रव्य बहुतसे आहे. त्याजला धनी कोन्ही नाही यैसा प्रकार आहे. सेवेसी श्रुतयें होये. राजश्री जणकोजी सिंदे याजकडील मुत्सदी दोन तीन असामिया व येक दोन साहुकार यैसे आहेत. ते द्रव्यानें थोर आहेत. द्रव्य बहुत आहे, म्हणोन गावात वार्ता बहुत आहे. रोज दररोज द्रव्य लांबवितात. भये निर्मान त्याजला साहेबाकडील जाले आहे यास्तव लांबवितात. मथुरेकडून पत्रे राजश्री चिंतोपंत याची निंबाबाईस येतात की जनकोजी सिंदे पाणपतानजीक आहेत; परंतु ठिकान लागत नाही. मणुशे शोधास पाठविली आहेत, यैसी पत्रं येतात. राजश्री बलवंतराव गोपाल हेहि भयाभीत बहुत आहेत. श्रीगोंदियात वार्ता यैसी जे, चिमाबाई सिंदी पुण्यात आहे तिने श्रीमंतास विनंती करून जफतिया उठविल्या. राजश्री रवलोजी सिंदे तुकोजी सिंदे याचे पुत्र याच्या बावाला राजश्री जणकोजी सिंदे याचा सरंजाम श्रीमंत करनार यैसी वार्ता बहुतसी आहे. सेवेसी श्रुत्ये होये हे विज्ञापना.