Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.32: [1-2-1762] Balaji Govind reports to the Peshwa that being outnumbered by the large force of Shuja he fell back upon Jhansi. From thence he moved on to Sironj where the discontented troops threatened him for their arrears. Shuja has advanced upon Jhansi and the writer says Jhansi cannot hold out long unless suc

Selections from the Peshwa Daftar 29.32

Language
Marathi

29.32

छ २८ शाबान

श्री

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे शेवेसी

विनंती सेवक बालाजी गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. ताा माघ शुध ७ मुकाम सागर स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकाचे वर्तमान यथास्थित

[१ शिंद्यांच्या दौलतीवर नवीन माणसाची नेमणूक होईपर्यंत जनकोजीच्या नांवें कारभार चालला असें दिसतें.]

4150 असे विशेष. इकडील वर्तमान दोनचार पत्रीं सेवेसी लिहिलेच आहे. हाली वर्तमान तरी सुजाउद्दौला पातशाहा कालपीस आलियाउपरी राजश्री गणेश संभाजी भेटले. आम्हासहि भेटीस बोलाविले होते. परंतु दग्याचा प्रकार आढळल्याउपरी आम्ही न गेलो. शेवटीं त्याची फौज चालोन मुकाबला जाल्यावर त्याचे सामान फार यामुळे आम्ही बुनगे सुधा सर्व संभाळून झासीस आलो. तेथील करऊन राजश्री बाबूराव कोनेर करारेयासी राहिले तेथीलहि बंदोबस्त जालियावर सिरोंजेस आलो. तो लोकानी फार गवगवा केला. रोजमरेयाकरितां यास्तव व माळव्यातील कादार सर्व उठोन जाऊं लागले. हटे वगैरे जागा तमाम दंगा जाला. सर्व मालवा जातो जाणून कांहीं फौज रा। वासुदेव संभाजी बरोबर उठोन गेली. राहिली ती व रा। धोंडो दत्तात्रेय पथकसुधा आम्हाबरोबर आले. हे घेऊन इकडे आलो. सुजाउद्दौला झासीस मोर्चे लाऊन आहे. येथून पाचसा मजलींवर आहे. झासी घेतल्यावर इकडे तो आला तर टिकाव होणे नाहीं. तमाम जमीदाराची सूत्रे त्यांकडे आहेत देखील रोहिले मालव्याचे. यास्तव जर जलदीने खासा स्वारी अथवा फौज मातबर पुढे रवाना होईल इकडे येईल तरीच स्थित राहील नाहींतर राहिले किले हेहि जातील. सविस्तर वर्तमान तीर्थस्वरूप राजश्री बाबूराव काका विनंती करितील. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.