Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.33: [16-2-1762] Naro Shankar writing to Vishvasrao Lakshman says he is meeting Malharrao Holkar the next day and thereupon proceeding to the north.

Selections from the Peshwa Daftar 29.33

Language
Marathi

29.33

श्री

श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री विश्वासराव यांसी प्रति नारो शंकर आशीर्वाद उपरी. येथील कुशल ता॥ छ २१ रजब मुकाम पाटोदे यथास्थित असे विशेष. तुम्हीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला अर्थ सविस्तर अवगत जाहाला. पत्रोत्तरे येथून वरचेवर पाठविली आहेत त्याजवरून कळलेच असेल. राजश्री मल्हारराव सुभेदार यांच्या व आमच्या उदईक भेटी होतील. तदनंतर सविस्तर मजकूर तुम्हास लिहोन पाठऊ. याउपरी इकडे गुंता किमपि नाही. मजल दरमजल त्या प्रांते येत असो. तुम्ही कोणेविसी चिंता न करावी. झासीकडील बातमी वरचेवरी लिहोन पाठवावी. बहुत काये लिहिणे आशीर्वाद.