Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.34: [26-2-1762] Naro Shankar acknowledges receipt of the letter giving news of the loss of Jhansi and writes that he is returning to the north to relieve the situation.

Selections from the Peshwa Daftar 29.34

Language
Marathi

29.34

श्री

श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री विश्वासराव यांसी प्रति नारो शंकर आसीर्वाद उपरी. येथील कुशल ता॥ छ १ साबान मु॥ मलगाव यथास्थित असे विशेष. तुम्ही माघ वद्य द्वितीयेचे पत्र पाठविले ते पावलें व आणखी तीन च्यार पत्रें पाठविली व झासी माघ शुध ७ शत्रूस वश जाहली याचें पत्र पाठविलें तें व कमावीसदारांची पत्रें तुम्हास आलीं ती तुम्ही बजिनस आम्हाकडे पाठविलीं ती पावलीं. तिकडील वर्तमान विस्तारयुक्त लिहिलें तें साद्यंत अवगत जाहाले. आमच्या व राजश्री सुभेदाराच्या भेटी नांदगाव साकोरे याचे मुकामी होऊन येथे आलो. पुढें मजल दरमजल त्या प्रांती येत असो. याउपरी इकडील गुंता किमपि उरला नाहीं. सत्वर येतो. कोणेविसी चिंता न करावी. बहुत काये लिहिणे हे आसीर्वाद. तुम्हापासी ऐवज जमा असेल तों आम्हाकडे रवाना करावा व फौजेचा खर्च भारी त्यांप्रांते येईल त्यास दोन च्यार लक्ष रुपये जमा करून ठेवावे. आम्ही सत्वर येतो हे आसीर्वाद.