Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.35: [26-2-1762] Naro Shankar acknowledges receipt of the letter giving news of the fall of Jhansi.

Selections from the Peshwa Daftar 29.35

Language
Marathi

29.35

श्री

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री चिमणाजीपंत व खंडोपंत स्वामी गोसांवी यासी

पो नारो शंकर कृतानेक नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असावे विशेष. तुम्ही पत्रे पाठविली ती पावलीं. झांसी गेलियाचे वगैरे वर्तमान तपशीलवार लिहिले ते अवगत जाहाले. ऐसियासी कालानुरुप होणे ते होतच आहे. आमच्या व राजश्री सुभेदाराच्या भेटी जाहल्या. याउपरी इकडेस गुता नाही. मजल दरमजल त्याप्रांते येत असो तुम्ही वरचेवर वर्तमान लिहोन पाठवीत जाणे. रा॥ छ १ साबान बहुत काये लिहिणे हे विनंती.

[4152]