Selections from the Peshwa Daftar 29.36: [26-2-1762] Naro Shankar's letter to his nephew Vishvasrao Lakshman discussing plans to be pursued after his arrival in the North. He concludes with a demand for funds to be remitted to Poona.
Selections from the Peshwa Daftar 29.36
- Language
- Marathi
29.36
पौ छ ६ साबान मुा महूखेडा
प्रा कायथे बुधवार दोन घटका
रात्र
श्री
श्रियासह सहस्रायु चिरंजीव विजईभव राजश्री विश्वासराव यासी नारोशंकर कृतानेक आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता छ १ साबान गुरुवार मुा ठाणे मळगाव सुखरूप असो विशेष. तुम्ही पत्रे दोन येक छ २२ रजव दुसरे छ २३ रोजचे पाठविलीं तीं पाऊन सकल लेखनार्थ अवगत जाला. झांशी वगैरे हिंदुस्थान प्रांतींचें वर्तमान लिहिलें ते सर्व तपशीलवार अवगत जालें. तुम्ही डाक बशिवली म्हणून लिहिले तर बहुत उतम केले. वरचेवर जाले वृत लिहित जांणे. पनासा हजाराची हुंडी पत्रं सुमार १३ पाठविली ती यादीप्रमाणें पावलीं. शहरीं रवाना केलीं आहेत. येवज पावलियांचे जाब आलियावरी तुम्हास लिहूं. पेशजी पंचाशीं हजारांच्या हुंडिया आल्या त्याहि पाठविल्या आहेत त्या खर्ध्या होऊन जाब आल्यानंतर तुम्हास लिहूं. पेशजीच्या व हालींच्या हुंडियाच्या पेटा घेऊन पाठऊन देणे. नेमिला येवजाचे निमे पदरी पडला. त्यापैकीं दोही रवानग्याच्या चिठिया पाठऊन बाकीच्या हुंडिया गडबडीमुळे न होत म्हणून येवज सराफियात अनामत राहिला म्हणून लिहिले. त्यास येथे आम्हाजवळ येवजाची खतूट आहे तर कळेल तशी तजवीज करून हुंडी पत्रांही ताबडतोब येवज येथे पावता होई तो अर्थ करणे. आम्ही ताबडतोब हिंदुस्थानांत येत असों. रा मल्हारजी होळकर या प्रांतात आले म्हणून त्यांचे भेटीगोष्टीमुळे आठचार दिवस लागले. आतां अविलंबेच येत असो. तुम्ही बहुत खबरदारीने राहात जाणे. याउपर सुज्यातदौलाने लबाडी केली. वरकड पातशाह व नजीबखान याचे मनात इतका अर्थ नाही. परंतु माधोसिंग राठोड सुज्यातदौला यानी लबाडी केली. याचा परिणाम सुधा होणार नाही. आम्ही दरमजलीने मालविया प्रांते लौकर येतो तोपर्यंत पाचलाख भरणा साहुकारास सत्वर पावता करणे. बाकी वसूल दाहपैकी होईल तो * * * रोजमरियासी पाहिजे याची फिकीर असो देणे. अवंदा फारच कठीण गोष्टी जाल्या. या प्रांती मोगलाचे मनात मागती बिघाड करावा जैसे मानस परंतु खर्चास नाही याजमुळे बिघाड करणार नाही. असो होणार ते होईल. आवंदा झासीची रसदेतील लाख दीड लाख सुरोज देऊन तुमचे चाकरी केली ते वृथा जाली. या खेरीज फौजेस खर्च दोनचारपर्यंत जाला आणीकहि होणार. सिंदे याची सरदारीत चिवडा दिसतो. पेसवे बदमामली (करितात) भेटीनंतर सविस्तर सांगू. तुम्ही तूर्त पंतप्रधान याचा भरणा सत्वर करणे. फौज बरानपूरपर्यंत आली नाहीं तो येवज लिा प्रो रवाना करणे. जासूद तुम्हाकडील सा रोजानी पावले. त्याचा करारप्रा मजुरा देणे. पुढे येवज परभारे औरंगाबादेस राा करणे. कासिदास खबरदारी सांगणे की कागदपत्र दुसरियासी नेमल नाही तरी आम्हाकडेच पाा परंतु लस्करात आम्हासीच गांठ घालून पत्रे प्रविष्ट होये ते करणे. येसी ताकीद पत्रे अणणारास करणे. प्रकार फारच बारीक जाला असे. सूचनार्थ लिहिला असे. दाह लाखचा तगादा करून येवज वसुलास येते करणे. हाती सर्व उजनीस आणने. फौजाहि लौकरच येतील. मग जैसा विचार करणे तो केला जाईल. तुम्ही उजनीस राहिलिया फारच कार्याची गोष्ट झाली. खर्च आटोपून करीत जाणे. तुम्ही शाहाणेच असा. सावधपणे राहात जाणे. वरचेवर वर्तमान लिहित जाणे बहुत काये लिा आसीर्वाद.
[१ स्वीकारलेली पण न पटवलेली.]
राा खंडोपंत व राा चिमणाजीपंत स्वामीस नमस्कार लिा