Selections from the Peshwa Daftar 29.37: [28-2-1762] Trimbakram informs the Peshwa that Jhansi has been attacked and cannot be expected to hold out long as the besieged are not being supported. Ganesh Sambaji is reported to have joined the ranks of Suja. The letter also refers to the illness of Malharrao Holkar.
Selections from the Peshwa Daftar 29.37
- Language
- Marathi
29.37
छ २८ शाबान
श्री
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी
विनंती. सेवक त्रिंबक राम कृतानेक साा नमस्कार विज्ञापना. ताा छ ३ साबान मुकाम नजीक संगनेर राजश्री सुभेदाराचे लस्करात स्वामीचे कृपेकरून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. पूर्वी दोनच्यार विनंतीपत्रे सेवेसी पाठविली. परंतु उत्तर न आले व कासीदहि माघारे न आले. मार्गी मारले किंवा काये जाहालें हे ईस्वर जाणे. त्यास इकडील वर्तमान तरी राजश्री गणेश संभाजीचे वर्तणुकेचा अर्थ पूर्वीपासोन सेवेसी लिहीत गेलो व परस्परे विदित जाहलाच आहे. गणेश संभाजीमुळे सरकारचा करोड रुपयाचा मुलुक गेला. * * * * जाहला आहे. शाहाजादा काल्पीत आहे व सुज्यातदौला झासीस आहे. किला जु * * * आहे परंतु कोणी * * * * त नाही. राजश्री नारो शंकर वगैरे सुभेदाराचे भेटीस आले होते. सेवकाचीहि
4154 भेट जाहाली. आद्याप खानदेशातच आहेत. कोणाची हिमत दरमजल जाऊन पोचतीलसी नजरेने पाहिली नाही. येक स्वामीचे पुण्यप्रतापें काही दिवस झासी राहील तरी कळेना. नाहीतरी ठीकता दिसत नाही. गणेश संभाजीकडे झासी होती परंतु राजश्री बाबूराव कोन्हेरा याणी छल करून हस्तगत केली. तेथील बंदोबस्त करून आपण कन्हेरा किला येथे आहेत. गणेश संभाजीचे कुटुंब व येक पुत्र व भाऊ वासुदेव संभाजी यास घेऊन राजश्री बालाजी गोविंद सिरोंजेस येऊन आपण सागरास गेले. धोंडो दत्तात्रेय गणेश संभाजीची माणसे घेऊन देसी येत आहेत. आठदाहा दिवसात पुण्यात येतील. राजश्री नारो शंकराकडील विस्वासराव लक्ष्मण झासीस म्हणोन गेले. परंतु राा सुभेदारास जखम लागली तिणे बहुत जेर होऊन माघारे फिरले याकरितां ते उजनीतच आहे. * * * * * सुभेदारास आजपावेतो आरोग्य नाही. बहुत क्षीण. तीन महिने स्नान नाही. शरीर बहुत तुटले. परंतु स्वामीचे पुण्ये आरोग्य होईल. सुभेदार इकडे आले यामुळे सर्वाचा धीर सुटला. दुसरे गणेश संभाजी जाऊन सुज्यातदौलास भेटला. घरचा मुदई तग निघेन. म्हणोन बालाजी गोविंद आले. किला गेल्यावर पुढे श्रम बहुत लागले. दिवसेंदिवस शत्रु भारी होत जात आहे. स्वामी पुण्यवान प्रतापी आहेत. पुढे सर्व उतमच होईल. प्रस्तुत जाले वर्तमान सेवेसी लिहिले आहे. गणेश संभाजीपासून निघोन यावेसे नव्हते. जीवाचा ग्राहीक होता. परंतु स्वामीचे कृपेकरून सर्व वस्तभाव व कागदपत्र सोडून जीव घेऊन सडा सुभेदारापासी आलो. त्याणी ठेऊन घेतले म्हणोन आज सा महिने समागमेच आहे. सेवेसी कळावे म्हणून विनंती लिहिली असे. आज्ञा येईल त्याप्रमाणे वर्तणूक करीन. श्रुत होये हे विज्ञापना.