Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.38: [3-3-1762] Naro Shankar while regretting the loss of Jhansi instructs his nephew to guard his position at Ujjain against further advance of the enemy and remit to Poona collections from Districts under his administration.

Selections from the Peshwa Daftar 29.38

Language
Marathi

29.38

श्री

श्रीसहस्रायु चिरंजीव राजमान्य राजश्री विस्वासराऊजी यास नारो शंकर कृतानेक आसीर्वाद उपरी येथील क्षेम ताा छ ६ माहे शाबान मुक्काम किले मलगाव सुखरूप जाणोन स्वकीये लेखन करणे विशेष. तुम्ही छ २९ रजबाची पत्रे पाठविली तें छ मजकूर पाऊन त्या प्रांतांतील दीलीपासोन उजेनपावेतो जाले वर्तमान मुलकातील व खानाजी जाधवराऊ याजकडील पत्राचा मजकूर दुसरे

Ca 73-5 पारसी पत्राच्या नकला पाठविल्या ते प्रविष्ट होऊन सविस्तर विदित जाले. त्यासी झासीचा प्रकार होणें तो भगवतसत्तेन जाला. पुढे होणार ते होईल. तुम्ही बहुत खबरदारीने बातमी राखून फौजसुधा संस्थान उजेनचा बदंबस्त राखून उत्तम प्रकारे सावध असणे. झासीचा कारभार तुम्हास सांगितला त्याचा प्रकार ऐसा जाला. पुढे उजेनची सुभेदारीचा कारभार दरोबस्त तुम्हाकडेच सांगितला आहे. तरी तेथील मामल्याच्या बंदबस्त राखून ऐवज तुम्हापासी जमा जाला आहे तो हुंडीपत्राने आम्हाकडे पाठऊन देणे. या कामास विलंब सहसा न करणे. हुंडणावळ आणा दोन आणे आधिक पडले तरी मुजाका नाही. इतके दिवस तुम्हापासी ऐवज जमा असोन आजपावेतो तुम्ही रवानगीची पैरवी न केली हे गोष्ट तुम्हापासोन दूर आहे. देशकाल मुलकातील तुम्ही पाहत असतात गाफिली केली आणि करीता हे अपूर्व. अथःपर लिहिल्याप्रमाणे साहुकाराचे विद्यमाने हुंड्यापत्रे हरतजवीज करून लौकर मार्गस्त आम्हाकडे करणे. हुंडीपत्रे पाठविल्यावरी मागाहून पेटाही सदरहू ऐवजाच्या पाठऊन देणे. सारांश ऐवजाचा निकाल करून देशी आम्हास पावता होये या तरतुदीस सहसा न चुकणे संस्थान उजेनची सुभेदारी तुम्हाकडे आहे. पुढेहि जो पैसा वसुलात येईल त्याचीहि पैरवी करून आम्हाकडे पाठऊन द्यावा. इकडून चिरंजीव त्रिंबकराऊ आवचितराऊ पांडुरंग शंकर फौज देऊन त्या प्रांतास रवाना केले आहेत. याचे हाती येक पैसा लागू न देणे, आम्हाकडे हुंड्या करून पाठऊन देणे. तुम्हापासी कामास येणार नाही. फौजेची उस्तवारी उत्तम प्रकारे राखून बहुत खबरदारीनें असणे. फौज त्या प्रांतास मातबर रवाना केली आहे. श्रीकृपेने सर्व गोष्टीचा बंदबस्त उत्तम प्रकारे होईल. तुम्ही कोणे गोष्टीची चिंता न करणे. याउपर बाबाजीपंताचे पनास हजार रुपये घेतले आहेत व राा धोंडोपंत कढे याचे पनास हजार हर तरतूद करून सुरोंज आहीरवाडियाचे येवजी अथवा दरयेक येवजीयात करणे. हे काम करणे जरूर असे. याउपर येवजाची रवानगी सत्वर करणे. तुम्ही उजनेप्रांतीच राहून पैका लौकर वसूल करणे. परभारा साहुकारीत येवज जमा करून दस्तायेवज आपले नावे घेणे. हुंडिया वरीचे वर रवाना करणे. मागाहून फौजहि लौकर त्या प्रांते येतील. फौज रुपये तुम्ही देणे. माहलचा येवज जमा करून कर्जदारास पावला पाहिजे. फौजेस (अपूर्ण)

[+ येथून अक्षर वेगळें.]

[4156.]