Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.39: [19-12-1735?] Naro Shivdev writes to the Peshwa that Abhaysing promises to relieve the Peshwa of his debts.

Selections from the Peshwa Daftar 29.39

Language
Marathi

29.39

छ १६ रमजान

श्रीशंकर

श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे शेवेसी.

विनंती सेवक आज्ञाधारक नारो सिवदेऊ कृतानेक साष्टाग नमस्कार विनंती. स्वामीचे कृपाद्रिस्टीकरून ता॥ छ १९ साबान मु॥ लस्कर नजीक मेडते सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. वार्तिकासमागमे आज्ञापत्र आले ते छ २ साबानी सादर जाले. आज्ञेप्रमाणें सविस्तर आर्थ माहाराजे अभयसिंगजीस विदित केला. थैली त्यास होती ते दिल्ही. जबानी कितेक मजकूर सांगितला. त्याजवरून यानी उतर दिल्हे जे हे मातबर मनसबा आहे. ये गोस्टीचा जाबसाल येका दिवसात होत नाही. प्रस्‍तु(त) कूच दरकूच मेडतियास जातो. तेथे गेलियानंतर ये गोस्टीचा पोख्ता मनसबा करून जे गोस्टीने राजश्री रायाचे कर्जाचा परिहार होय आणि फौजेची उस्तवारी होऊन महद येश पदरी पडे तो आर्थ करून, येविषयी तुम्ही आपले समाधान आसो देणे. इतके दिवस दिगत लागली त्याचा विचार तुम्ही जाणता याजवरी ढील होणार नाही. मेडतियास गेलियानंतर कार्याचा निश्चय करून तुम्हासहि आज्ञा देऊन. याजप्रकारे जाबसाले जाला. सेवेसी विदित होय. स्वामीचे पत्रांपूर्वीच माहाराजे आभयेसिंगजीनी पत्र स्वामीस लिहीले होते तेच पाठविले आहे. प्रविष्ट होईल. सरकारचे जासूद आम्हासमागमे होते. त्यास येक जोडी पूर्वीच बिदा केली. हार्ली येक जोडी राहिली ते सेवेसी पत्रे देऊन बिदा केली आसे. विदित होय हे विज्ञप्ति. मेडतियास गेलियानंतर पांच सात रोज राहोन पुढे आजमेरस जाणार. कमरुदीखान याजकडून येक ग्रहस्त पत्रे घेऊन आला आहे याजकरितां पुढे जरूर जाणार. विदित होय हे विज्ञप्ति.