Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.40: [25-4-1762] Balaji Govind to Malharrao Holkar, reporting risings in the Doab on the part of the Jamindars.

Selections from the Peshwa Daftar 29.40

Language
Marathi

29.40

छ २४ जिलकाद इसने सितैन

श्री

राजश्री मल्हारजी बावा होळकर सुभेदार गोसावी यासीं

छ सकलगुणांलकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्रो बाळाजी गोविंद आशीर्वाद विनंती. येथील कुशल ता॥ वैशाख शु॥ १ पर्यंत आपले

4157 कृपेकरून यथास्थित असे विशेष. या प्रांताचे वर्तमान आपणास दोन च्यार पत्रीं लिहिलें, त्याजवरून विदित जाहलेच असेल. अंतर्वेदीत सर्व जागा कनोज आदिकरून ठाणी सरकारची बसविली. एक गाजीपूरचा किला रूपराय व कीरतसिंग खिचर याणे घेतला. तेथें त्याचा जमावहि जाला आहे. त्यास्थली मेहनत पडेल. वरकड ठाणीं कसब्यांत मात्र बसली. परंतु तमाम गावगना जमीदार गढ्या बांधोन फिरोन राहिले आहेत. रबीचा अमल खाऊन जुजायाची तयारी करून बसले आहेत. त्याचे परिपत्यास दिसगत लागेल; सालमारी तो पैसा मिळणे नाहीं, खळ्यांत दाणा एक ठेविला नाहीं. येक तालगावी तीनसे गढी जाहली. याप्रमाणे वर्तमान आहे. पुढें यथास्थित जाहल्यास पारपत्य सर्वांचे होईल. प्रस्तुत आम्ही सलुखानेंच त्यासी आहो. बहुत काय लिहिणे, कृपा केली पाहिजे. हे विनंती.