Selections from the Peshwa Daftar 29.5: [25-6-1761] Balaji Govind reporting his efforts to restore Maratha prestige in the North.
Selections from the Peshwa Daftar 29.5
- Language
- Marathi
29.5
छ २८ जिल्काद
श्री
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे शेवेसीं
विनंती. सेवक बालाजी गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. ता॥ जेष्ठ वद्य ८ स्वामीचे कृपावलोकनेकरून शेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. आज्ञापत्र सादर जाले तेथे आज्ञा कीं सुजाउदौले याणी पत्र लिहिलें कीं सरकारची ठाणी बसवावी. त्यावरून त्यास थैली पाठविली आहे. तुम्ही याउपरी अंतरवेदीत ठाणी बसवणे म्हणून आज्ञा. त्यास अंतरवेदींत उतरल्याचे व ठाण्याचे बंदोबस्त केल्याचें शेवेसी दोनच्यार पत्रीं लिहिलेंच आहे. अंतरवेदीत उतरल्यावर रोहिले पठाण याचे दोन ठाण्यासी मात्र जुंज जाले. तेथे स्वामीचे प्रतापेकरून नक्षच जाला. वरकड ठाणी रोहिल्र्यानी पठाणानी सलुखानेच सोडिली. सुजाउदौला याणीहि सलुखानेच सोडिली. येक गाजीपूरचा किला सुजाउदौलाकडील फौजदाराने खिचरास दिल्हा. त्यामुळे खिचरानें मातबर सरंजाम करून बसला आहे. वरकड तमाम जमीदार गढीबंद जाले आहेत. रयेतचे घरांत पैसा राहूं दिल्हा नाहीं. मुलुक काही पठाण रोहिले याणी लुटला. बाकी जमीदारानीं पैसा खाऊन गढ्या बलकाऊन बसले आहेत. येकाद्याचें पारपत्य करावे त्यास राजश्री मल्हारजी बावाचे फौजेचा शह या प्रांतातून ढळला, यामुले फिरोन रोहिले याणी लबाडी करून आलीकडे उतरले. हाफीज रहमत, दुंदेखा वगैरे आंबल्याहून कूच केले. पुढें फौज आलीकडे आली. सकुराबादेचे ठाणे त्याणी बसविले. आम्ही येथून फौज पाठविली आहे. जमिदारांसी तूर्त स्नेहच करून थोक थोक हाती घेतले आहेत. अहमदखान आम्हासी बाह्यात्कारे स्नेह दाखवितो; परंतु अंतरी लबाड आहे. आम्हास कुमक कोणाकडील व्हावी तो अर्थ राहिला नाही. स्वामीचे प्रतापेकरून आमचे वस्तु होईल तेथवर बंदोबस्त करीतच आहो. रा गंगाधरपंत तात्या मथुरेस आहेत. सुरजमल जाट याणे आगरेयाचे किल्यास मोर्चे लाविले. किल्लेदार मजबुदीने जुंजत आहे. नजीबखान व पारचे रोहिले येकमते सर्व आहेत. अलीगोहेर यासी आणावयाच्या विचारात आहे. सुजाउदौला जीवनपुरास दाखल जाला. अलीगोहर पटण्याहून तीन मजली अलीकडे आला आहे. फिरंगियाचे स्वाधीन आहे. मागाहून येईल वर्तमान सेवेसी लिहीत जाऊ. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.