Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.41: [25-5-1761] Chimnaji Rangnath to the Peshwa from Umargad, requesting orders for the payment of his troops. He reviews the position of the various Maratha chiefs in the Doab and Bundelkhand.

Selections from the Peshwa Daftar 29.41

Language
Marathi

29.41

छ २४ जिलकाद इसने सितैन

श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसी.

विनंती सेवक चिमणाजी रंगनाथ. कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना. येथील क्षेम ताा छ १९ माहे सवाल मु॥ उमरंगड स्वामीचे पुन्यप्रतापेंकरून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. श्रीमंत राजश्री भाऊसाहेबीं राजे खेतसिंग राजे हिंदुंपतीचा धाकटा भाऊ याजकडे हुजूर न्यावयाकरितां पाठविले. त्यास राजे यास कितेका प्रकारें समजोन सांगत गेलों, तेव्हां कार्त्ति(क) मासापासून हुजूर येयाचे तरतुदीत होते. आपले स्थळीहून कूच करून राजश्री गणेश संभाजी यापासी आले. आठा दहा रोजांत दिलीकडे यावें तो तिकडे लढाई जाली. तेव्हां पंत मारनुलेपासून राजे मार आपले माघारे ठिकाणास गेले. मीहि त्याबरोबर गेलों, पांच महिने राहिलों; परंतु त्याची नजर पूर्वत प्रो न राहिली. परस्परे दरबारचे वर्तमान कले कीं मी येथें न राहावें ऐसा त्याच्या चितांतील

[१ जिल्हा ईटावा, जलेश्वरजवळ.]

1150 मनोदय देखिला; आणि दरबारचाहि रंग त्याप्रकारचा पाहिला. तेव्हां हुजूर यावयाकरितां आज्ञा मागू तेहि देईनात. समागमें सिबंदी खर्च बहुत; खर्चास पैसा देईनात. राजश्री गोविंद बळाळ याचे तर्फेने तहसिलीस राघो विष्णु होते यामुळे स्वामीचे पुण्यप्रतापेंकरून सेवकाची खर्चाविषयीं स्थित राहिली. तहसिलीस पंत मारनुले होते त्यास रु॥ देईनात तेव्हां ते उठोन आपले यजमानाकडे गेले. बुंधेल्याचा कारभार लबाडीचा, त्यास स्वामी पूर्वीपासून जाणतच आहेत. तेव्हा मीहि त्यापासून रो गणेशपंतापासीं आलों. राजे पहाडसिंग याकडे स्वामीनी रो कृष्णराव गोविंद यास पाठविले होते. त्यास सरकारचे आज्ञाप्रो पंत मारनुलेस कितेका प्रकारें उमजोन सांगितलें; परंतु त्यानी न यैकिलें. याकरितां येथून श्रीमंत राजश्री सुभेदार याजकडे जावयासी पंत मारनुले आले. त्यासमागमे मीहि आलों. त्याकडे जावे तो मार्ग फुटत नाहीं. स्वामीपासीं एकासी मार्ग चालेना. एसा प्रकार जाला आहे. समागमे खर्च बहुत मार्ग चालेना सबब राजश्री बाळाजी गोविंद यापासीं आहे. याजला आज्ञा खर्चविशईं लिहिल्याने देतील. पंत मारनुलेनी पहिली ठाणी काही बसविलीं, कांहीं राहिली आहेत तेहि बसतील. कितेक तपसीलवारें रा॥ कृष्ण गोविंद यांही लिहिले आहे त्यावरून सविस्तर अर्थ स्वामीस निवेदन होईल. जैसी सेवकास आज्ञापत्र येईल, तैसी वर्तणूक करीन. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति.