Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.42: [28-9-1762?] Mahadaji Sindia informs the Peshwa that Gulraj and Nandram, two ambassadors, have been dispatched by Ahmedshah Abdali to settle terms of peace.

Selections from the Peshwa Daftar 29.42

Language
Marathi

29.42

पौ छ २३ रजब.

श्री

श्रीमंत माहाराज राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी

विनंती सेवक माहादजी सिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. येथील सेवकाचें वृत तागायेत छ ९ माहे रबिलावल मु॥ प्रांत जैपूर ना फागी स्वामीचे आसीर्वादे यथास्थित असे विशेष. गुलराज व नंदराम हे उभैता शाहाकडून राजश्री पुरुषोतम माहादेव याजराबरी आले ते आम्हाजवळ येऊन कितेक वृतांत सांगितला त्यावरून कललें. येशास मशारनिलेचा सन्मान बहुता प्रकारे करून येथून बिदा महाराजाचे सेवेसी केले असे. हे कितेक अर्थ तेथे आल्यानंतर सेवेसी श्रुत करितिल. त्यावरून विदित होईल. तदोत्तर याजवरी कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.