Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.43: [20-12-1761] Naro Shankar instructs Govind Kalyan to send to Poona revenue collections from the provinces of Sironj and Ahirwada.

Selections from the Peshwa Daftar 29.43

Language
Marathi

29.43

नकल

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंद कल्याण

स्वामी गोसावी यांसी

सो नारो शंकर नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल ता॥ छ २२ जमादिलावल मु॥ पेडगाव भीमातीर जाणून स्वकीय लिहिणे विशेष. तुम्ही वरचेवर पत्राचा पूर केला. सिरोंज आहीरवाडा येथील मामलेतीविसी वारंवार लिहीत गेला. त्याजवरून दोन लाख रु॥ रसद करार करून मामलत करून घेतली. याजउपरी पत्रदर्शनी दोन लाखाच्या चिठ्या पुण्याच्या तुम्ही पाठवून देणे. तुम्हाकडून विलंब लागल्यास सरकारात येवजाचा वोढा फार याजकरिता दुसरे हरकोणापासून येवज घ्यावा लागेल. मग आम्हाकडे शब्द न ठेवणे. पैकियाची निकड बहुत असे. पहिली तुम्हास पत्रे लिहिली आहेत ती पावलीच आस्तीक. हाली हें पत्र लिहा आहे. क्षणाचा विलंब न लाविता पत्रदर्शनी दोन लक्षाच्या चिठ्या खाना करणें. चिरंजीव राजश्री रावजीची रवानगी केली असे. इजतखान सुज्याखान त्यासमागमे दरोबस्त फौजेनसी रवाना करणे. आहिरासी सळख करून आहीरहि रावजीसमागमे देऊन भारी जमावानसीं झासीस जाऊन तेथील बंदोबस्त यथास्थित होऊन झांसी व किले कन्हेरा यांचा बंदोबस्त झाल्यानंतर वरचेवरी कागदपत्र पाठवून वर्तमान लिहोन पाठवणे. सिरोंज आहीरवाडा येथील मामलेतीचा बंदोबस्त तुम्ही करणे. पैका रसदेचा दोन लाख रुपये लौकर पाठऊन देणे. तिकडील नवल विशेष लिहून पाठविणे. इकडील सविस्तर चिरंजीव राजश्री रावजीचे पत्रावरून कलो येईल. बहुत काये लिहिणे हे विनंती.