Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.44: [Recd. 1-7-1761 ?] Mahipatrao Govind writes to Mahipatrao at Jhansi that he is ready for the attack of the enemy reported to be one thousand strong, and thanks the latter for the reinforcements sent by him.

Selections from the Peshwa Daftar 29.44

Language
Marathi

29.44

पो छ ९ जिल्हेंज

श्रीशंकर

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री महिपतरावजी

स्वामींचे सेवेसी

सेवक महिपतराव गोविंद कृतानेक सां नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करीत असिले पाहिजे विशेष. पत्र पा॥ ते पावले. लिा सावधपणे राहणे चिंता न करावी. झासीहून दारूगोली व संभर गारदी पा॥ आहेत ते पोहचतील. त्यास आम्ही बहुत हुशार आहो. खावंद आहेत उपराळा करतीलच. आज रोहिलेयाची फौज हजार स्वार आले आहेत. गस्त देऊन बाजारात उभे राहिले आहेत. त्यास आम्हासी मोहरा जुडल्यावर ईस्वर साहे होईल, चिंता नाही. श्रीमंताचे प्रतापेंकरून सर्व उतमच होईल. उदईक त्याची सारी फौज येईल. आम्ही बहुत खबरदारीने आहो. चिंता न करावी. श्रीमंत राजश्री राजश्री रावसाहेबाकडे वर्तमान पोहचाऊन देणे. कळले पाहिजे. कृपा लोभ असो दीजे हे विनंती.

(पुढील चार ओळी मजकूर गैरउपयोगी सबब गाळला.)