Selections from the Peshwa Daftar 29.45: [21-3-1763 ?] Kasi Narsi explains to Raghunathrao that he is in no way responsible for the Narasinggarh affairs. It was all the work of Ganesh Sambhaji.
Selections from the Peshwa Daftar 29.45
- Language
- Marathi
29.45
छ २२ रमजान
श्री
श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसी.
विनंती सेवक कासी नरसी, कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. तागाइत छ ९ रमजान, मुक्काम कालपी, स्वामीचे कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असें विशेष. आज्ञापत्र सादर जालें. तेथें आज्ञा कीं, नरसिंगडच्या जाबसाला-विशीं हुजूर येणें व राजश्री चिंतो अनंत यांणीं लिहिलें कीं, नरसिंगड तालुका गणेश संभाजी यांजकडून बापूजी नारायण यांजकडे होता त्यास पाठीशीं घातला होता म्हणोन हुजूर जाबसालास येणें, यैसी आज्ञा जाली आहे. त्यास राजश्री गणेश संभाजी पेशजी हुजूरून मामलत करून आले. त्याउपर या प्रांतीं
4161 धामधूम जाली. पातशा(हा) व सुजातदौले येमुना उतरले, तेव्हां गणेश संभाजी त्यांस भेटोन मोठीं मोठीं कामें केलीं. कोणी मामलेदार ठाणें राहूं पावले नाहीं. तमाम प्रांताच्या सनदां पातशाहापासून घेऊन मुलूक लुटून पस्त केला. दीड वर्ष चाकर आविंदायचे जाले. तेथें ठीक न पडे. तेव्हां राजश्री माहादजी शिंदे यांजकडील संताजी बाबळे वगैरे सरदार आले, त्यांजला भेटोन सागराकडे आले. येऊन आमचे तालुक्यांतील गाव राहिले होते, त्यासच लुटूं लागले. यास्तव सांगोन पाठविलें कीं, आपण सरकारचे माहाल कां लुटितांत ? या प्रांतीं यावयासी कारण काये ? तेव्हां पंत मशारनिल्हेनीं जाबसाल केला कीं, नरसिंगडचे बंदोबस्ता(स) जातों. तेव्हां गणेशपंत पातशाही चाकर होते. स्वामींचे आज्ञेशिवाय फिरोन प्रांतांत जाऊन गांवजागा लुटतील. आम्हांकडील तालुक्याची जागा लुटली जाईल. बापूजी नारायेणहि आम्हांकडील ठाणीं राहिलीं, याच आसरेयानें राहिलें. जागा रक्षिली. राजे जगतराज यांजकडील कुवरमण याणें नरसिंगडु तीन वेळ घेतला, जागा सर्व लुटली. तेच गत आमचेही जाग्याची जाली. बापूजी नारायेण यांचा बचाव होणार नाहीं म्हणोन तेच आगोदरच गणेश संभाजीच्या भयानें देवरीकडे गेले. आम्ही च्यार गोष्टी पंत मशारनिल्हेस सांगितल्या. वरकड नरसिंगडचा रुपया व हिशोब आम्ही घेतला नाहीं. बापूजी नारायेण हिशोब घेऊन पुण्यास गेले. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.