Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.46: [21-3-1763 ?] Balaji Govind tries to explain why Kasi Narsi befriended Bapuji Narayan, a servant of Ganesh Sambhaji who has turned disloyal.

Selections from the Peshwa Daftar 29.46

Language
Marathi

29.46

पो॥ छ २२ रमजान

श्री

श्रीमंत राजश्री दादा साहेब स्वामीचे

सेवेसी

विनंती सेवक बाळाजी गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. तागाईत छ ५ रमजान मुकाम कालपी स्वामीचें कृपावलोकनेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असें विशेष. आज्ञापत्र सादर आलें तेथें आज्ञा कीं काशी नरसी यास हुजूर पाठवणें व राजश्री चिंतो अनंत यांणीं लिहिलें कीं नरसिंगड तालुका गणेश संभाजी याजकडून बापूजी नारायण याजकडे होता, त्यास काशीपं त्यांनीं पाठीशीं घातला. त्याचा जाबसालास पंत मशारनिलेस हुजुर पाठवणें म्हणोन अज्ञा जाली

४162 आहे. त्यास राजश्री गणेश संभाजी हुजूरून मामलत करून आले. तदोत्तर धुंडी झाली, तेव्हा गणेश संभाजी याही मोठींमोठीं कामें केलीं; कोणी मामलेदार राहूं पावले नाहीं(त). तमाम प्रांताचा इजारा नवाब सुज्यादौला याजकडून करून घेतला. पातशाही चाकर जाले, दीड वर्षपर्यंत चाकरी केली, तेथें ठीक न पडें. तेव्हां राजश्री माहादाजी बावा शिंदे याजकडील संताजी वावळे वगैरे सरदार आले. त्यांजला भेटोन सागराकडे आले. तिकडे आमचे तालुक्यांतील गांव राहिले होते त्यांसच लुटों लागले. यास्तव तीर्थस्वरूप राजश्री काशीपंतों सांगोन पाठविलें कीं आपण सरकारचे माहाल कां लुटतां ? याप्रांतीं यावयास कारण काय? तेव्हां पंत मशारनिलेंनीं जाबसाल केला कीं नरसिंगडचे बंदोबस्तास जातों. तेव्हां काशीपंतीं विचार केला कीं गणेशपंत पातशाही चाकर होते. स्वामीचे आज्ञेशिवाय फिरोन प्रांतांत जाऊन गांव जागा लुटूं लागतील. आम्हांकडील तालुक्याची जागा लुटली जाईल. बापूजी नारायणहि आम्हाकडील ठाणीं राहिलीं याच आसरेयानें राहिले. जागा रक्षिली, तीन वेळ नरसिंगड राजे जगतराज याजकडून कुवरमणानें घेतला. जागा लुटली, आमचेहि जाग्यांत तेच गत जाली. बापूजी नारायण याचा बचाव होणार नाही, यास्तव पंत मशारनिलेस च्यार गोष्टी सांगितल्या. मशारनिले अगोदरच गणेश संभाजी याचे दर्पानेंच देवरीकडे गेले, त्याजकडील रुपया हिशेब काशीपंतीं घेतला नाहीं. हिशेबकितेब बापूजी नारायण घेऊन पुण्यास गेले. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.