Selections from the Peshwa Daftar 29.47: [28-5-1763] A touching appeal to Vishwasrao Lakshman of Jhansi by Trimbak Krishna (Kanitkar) requesting him to send help to Govindpant Subhedar and the Holkar against the aggression of the Jats. The writer also reminds him of past occasions when the Peshwas helped their sardars and thus impressed on him the nec
Selections from the Peshwa Daftar 29.47
- Language
- Marathi
29.47
पौ छ १९ जिलकाद
श्री
श्रीमंत राजश्री विश्वासरावजी स्वामीचे
सेवेसी
विनंती सेवक त्र्यंबक कृष्ण कृतानेक सां नमस्कार विनंती उपरी. येथील क्षेम ता॥ छ १४ जिलकाद मंदवासर प्रातःकाल मु॥ भरोली यथास्थित जाणून स्वकीय कुशल लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे विशेष. आम्ही राजश्री
[१ दुंढी-दंगा.]
Oa 73-6 बालाजी गोविंद याचे लस्करात फौज आणावयासी गेलो होतो. त्यासी तेथील प्रकार पाहिला तर सारा गोगा होता म्हणून तेथून उठोन आलो. पेशजी चिरंजीव राजश्री बालाजीपंत नी राजश्री यादवराऊ यास विनंती केली की जाठ गरविष्ठ फार जाहाला आहे. त्यास तुम्ही या प्रसंगी राजश्री सुभेदाराचा उपराला करावा यैसे बहुत प्रकारे सांगितले, परंतु त्याचे मर्जीस न आले. सांप्रत्य सेवेसी विनंतीपत्र पाठविले आहे. त्यास पाचसातसे राऊत चांगले निवडक सरंजाम उतम करोल यैसे नेहमी असेल ते आम्हाकडे पाठऊन द्यावे. त्याचा रोजमरा यथातथ्य जो असेल तो लेहून पाठवावा. जैसे आपणाजवळ बसोन खात आहेत तैसे इकडेच पाठऊन च्यार दिवस राजश्री सुभेदाराचा उपराला करावा यात महद यश येईल आणि श्रीमंताजवळ लौकीक होईल. जाटहि पंचमाहालाकडे आला आहे. त्यासी आम्ही सिमथारवालेहि नेमस्त केले आहे. आणि आपणहि चित्ती धरून जे स्वार पाठवावयाचे ते पाठवावे म्हणजे सिमथरकर व आपले स्वार यैसे एकत्र होऊन जमावासी गालेरीस जाऊ. तुम्ही संस्थानी सरदार विसा कोसावर असता गालेरीस हा गोहदकर गुलाम उपद्रव देतो, उपराला न होये, आश्चर्य आहे. दक्षिणी लोकास कालच पाठीस लागला. मागे श्रीमंत राजश्री नाना श्रीमंत विठलराऊजीचा उपराला करीत होते. भीममिसंग मारला तेव्हा राजश्री चिमणाजीपंत आठ महिने फौजसुधा आपले पदरचे खाऊन गोहदेस मोरचे लाविले होते. विठलराऊ कितिक वेल कामास त्यास आले. आता तो प्रकार नाही. तोतयाचे वेलेस आपले देहाल्याचा कटा केला. घोडी पडली. खिनारियावर आमचे पागेचे भले माणूस पडले. घोडी पडली. काही तरी ध्यानास आणावे. रावसाहेब, प्रसंग राहाणार नाही. आमचा यत्न आम्ही केला. कोन्ही साह्ये व्हाना, हे थोरपणास योग्य नाही. सेक इमाम वगैरे पाचसे स्वार तरी पाठवावे. किल्याचे दक्षिणेस जाठ आला आहे. आमची फौज पाठोपाठ आहे. यैसिया प्रसंगी मानपान पाहावा यैसे नाही. रावसाहेब, परस्परे आगत्यवाद न धरावा, विहित नाही. यैशा प्रसंगी खासा कंबरबस्ती करून कोन्ही न ये तर आपणच यावे. गोविंदपंत सुभेदार बहुत थोर आहेत, याचे साहित्य करावे. ईश्वराजवल मजरा आहे. सिंदेच्या कडेस येऊन यादवराऊ माघारे गेले, पंधरा कोस गोलेरीस न गेले. आसो याउपरी तरी कृपा करावी. लोभ कीजे हे विनंती. देसीहून काही वर्तमान कागदपत्र आला असेल तरी लिहून पाठवावे हे विनंती.