Selections from the Peshwa Daftar 29.48: [19-9-1763] Gangadhar Yashvant writes that as Mahadji Sindia could not settle matters amicably with Sakhubai Sindia, the robes of honour were conferred on Manaji Sindia, at which Mahadji took offence and went back to Ujjain. The letter is perhaps addressed to Raghunathrao.
Selections from the Peshwa Daftar 29.48
- Language
- Marathi
29.48
पौ छ ११ रावल
श्रीमोरया
शेवेसी विज्ञापना. राजश्री माहादजी सिंदे यासी हुजूर यावयाकरितां पत्रे पाठविली; परंतु त्याचा यावयाचा प्रकार न दिसे. तों सखूबाई हुजूर अली म्हणून मशारनिल्हेहि येऊन भेटले. त्याजला आज्ञा केली कीं सखूबाईची कृपा संपादून घेणे. परंतु हे त्याजला अनकूल न पडले. तेव्हा सखूबाईचे मर्जीस्तव राजश्री मानाजी सिंदे यासी सरदारीची वस्त्रे देऊन राजश्री माहादाजी गोविंद कारभारी करून दिल्हे. येका मासांत दाहा हजार फौजनसी तुम्हापासीं पोंहचतील. माहादजी सिंदे यासी चौ हजारा फौजेची सरदारी देत होतो तें अमान्य करून उठोन तिकडे आले म्हणून विस्तारे करून आज्ञापिले. यैसीयासी आपणास सखूबाईचे श्रम न देखवत. यास्तव साहेबी राजश्री मानाजी सिंदे याजवर कृपालु होऊन पूर्ववतप्रों स्थापना करून सरदारीची वस्त्रे दिधली. बहुत उत्तम. खावंदाची मर्जी ते मान्य असे. स्वामीचे आज्ञेविरहित कोण आहे ? राजेंश्री माहादजी सिंदे उजनीस दाखल जाहाले. स्वामीचे खानाजाद सरदार खावंदाच्या पायांखेरीज कोठे जातील ? सर्व बडवार खावंदाच्या पायांपासी जाली आहे. इकडे बोलाविले आसेत. सर्व उर्जित करणार खावंद समर्थ आसेत. शेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.+