Selections from the Peshwa Daftar 29.49: [End of 1763] Gangadhar Yashvant writing to Balaji Govind and Gangadhar Govind informs them that the campaign against the Nizam resulted in a great victory for the Marathas. The forces thus relieved will soon march to the north under the command of Vishvasrao Lakshman. Tukoji Holkar, Balaji and Gangadhar are advi
Selections from the Peshwa Daftar 29.49
- Language
- Marathi
29.49
श्रीमोरया
चिरंजीव राजश्री बालाजीपंत व राजश्री गंगाधरपंत यांसी प्रति गंगाधर यशवंत आसीर्वाद उपरी. येथील क्षेम जाणून स्वकीय कुशललेखन करीत जाणे विशेष. तुम्ही सर्व सरंजामानसी सुरंजच्या म्लात आला म्हणोन येकिले. देशासी जाणार येसियासी देशी मोगलाने हतवीर्य होऊन नवी जागीर श्रीमंतास देऊन सला केला.
[+ पत्र गंगाधर यशवंताचें रघुनाथरावदादांस असावें.]
तिकडील गुंता उरकला. झाडून फौजा रवाना जाल्या. दरमजल येतात. येथून राजश्री तुकोजी होळकर फौजसुधा ते प्रांतच्या बंदबस्तास रवाना केले ते व राजश्री विश्वासराव लक्ष्मण मिलोन येतील. तुम्ही त्यासी सामील होऊन ते प्रांतचा बंदबस्त होये ते गोष्ट करणे. दुरंदेशी ध्यानात आणून तूर्त देशी जावयाचे न करावे. सविस्तरे येजमान पत्रावरून देसी सलुख जाहाला. दरबारी बेगमी केली पाहिजे. येथूनहि फौज रवाना केली आणि राजश्री नारोपंत नाना व राजश्री विठलराव तात्या मातबर फौजनसी येत आहेत. तुम्ही व चिरंजीव राजश्री विस्वासराव वगैरे दम धरून पूर्ववत करार करून च्यार पैसे खावंदास जागा जाहाली म्हुणिजे स्वामिसेवा उतम आहे. सर्व तुम्हास कलत आहे. विस्तारे काये लिहिणे लोभ असो दीजे हे आसीर्वाद. मुखवचने राजश्री चिमणाजीपंत आपा सांगतील ते धानास धरून व राजश्री जनार्दनपंत बावा सांगतील ते येकून उत्तम दिसेल ते करावे हे आसीर्वाद.