Selections from the Peshwa Daftar 29.50: [1764] The battle of Baxar between Shuja-ud-daula and the English and the losses that it entailed on the former are described in this letter addressed to Dadasaheb.
Selections from the Peshwa Daftar 29.50
- Language
- Marathi
29.50
श्री
पु॥ श्रीमंत राजश्री दादासाहेब
स्वामीचे सेवेसी
विज्ञाप्ति ऐसीजे. पातशाह व सुज्यातदौले फौजेसुधा पटण्याआलीकडे पस्तीस कोस जाऊन मुकाम केला. पटणियाकडून फिरंगी अले. अगोधर जाबसाल सलुकाचा फिरंगियानी लाविला होता, त्याचा मातबर माणूस पातशाहपाशीं आला कीं मुलाजमतीस येतात; मामलत करूं. त्यावरून सुज्यातदौले यानी विचार केला की फिरंगी हरामजादे आहेत, भरोसा नाही म्हणोन पातशाह व बुणगे ऐसे माघे ठेऊन बारा कोस आणि फर्दे पंचवीस तीस हजार फौजेनसी सडेच गेले. तिकडून फिरंगी दहापंधरा हजार फौजेनसी आले. पहिला प्रहर पावेतों सलुखाची गोष्टमात होती. कोसा दोकोसाचें अंतर राहिले होते. तेथेंच लढाई मातबर सुरू झाली. तरवारी तरवार जाली. संध्याकाळ जाला. फिरंगियाकडील तीन
4166 हजार माणूस ठार जाले व धरले आले. जखमी बहुत जाले. राहिले ते पळोन गेले. सब्या फौजेचे बुणगे मागे होते त्यावर माघारे दुसरी टोळी फिरंगियाची येऊन पडली. बुणगे लुटले. मागती युध्य जाले. सुज्यातदौलाकडील शुज्याकुलीखान व बेणीबाहदर याकडील गुलाम कादरखान ऐसे दोघे सरदार ठार झाले. रात्र बहुत जाली. शुज्यातदौले फौजेसुधा शिकस्त खाऊन माघार निघोन कूच दरकूच येत होते, तो सुवर्णभद्रोत दाहा बारा हजार माणूस बुडोन मेले; वस्तभाव गेली आता राहिली फौज घेऊन वाराणशीस दाखल जाले. बुणगे व पातशाह मागे होते तेहि मागून येतात. फिरंगी जेथे होते येथेच आहेत. पुढें पाहावे निदर्शनास येईल ते सो॥ विनंती लिहूं. बेणीबाहदर याने अयुधेकरास म्हटलें कीं बेहिमत न होणे, नवी फौज ठेवाव त्यास करोड रुपयाचा सरंजाम करून देईन. या प्रो करार करून फौज नवी ठेवितात +हे विनंती.