Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.51: [Just after 9-4-1758] Rajaram Govind informs Dadasaheb that the Vazir accompanied by the Rohilla chiefs has started for Delhi.

Selections from the Peshwa Daftar 29.51

Language
Marathi

29.51

[seal: श्री]

सेवेसी राजाराम गोविंद विज्ञाप्ति ऐसी जे. पूर्वी सेवेसी विनंतीपत्रं पाठविली आहेत त्याजवरून वृत श्रुत जाहाले असेल. हालीचे वर्तमान ; नवाब वजीर व या उभयता सरदाराच्या फौजा व याचे सरदार ऐसे छ ३० रजबी फरुकाबादेहून कूच करून बाहीर डेरे दाख(ल) जाहाले. येथून कूच दो चौ दिवसात होऊन मजल दरमजल जगमनपूरचे घाटास येमुना उतरावयासी येतील. त्यास तेथे नावा पाहिजेत. तर कृपा करून रा। बालाजी गोविंद यास येक पत्र पाठवले की नावा पंचवीस जगमनपूरचे घाटास पाठवीत म्हणजे लस्कर लवकर उतरून सो॥ हाजर होये ते करणार स्वामी समर्थ आहेत. वजिरानी सांगितले जे, आम्ही कोणे स्थली येऊन पोहोचावे ? उत्तरी सनाथ करिणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.

[१ शोणभद्र नदी. + येथून अक्षर वेगळें.]