Selections from the Peshwa Daftar 29.52: [February 1765] Ragho Nilkanth solicits Raghoba's favour to enable him to pay off his debts. He further sends him news of the revolution in Bengal which he gathered from the letters of his creditors. Mir Kasim has been defeated by the English and seeks an alliance with Shuja-ud-daula and the Marathas in order to ma
Selections from the Peshwa Daftar 29.52
- Language
- Marathi
29.52
पो छ २९ साबान
श्री
श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसी
सेवक आज्ञाधारक राघो निळकंठ सां। नमस्कार विज्ञापणा ऐसीजे. ता॥ छ साबान मु॥ पुणे जाणोन स्वामीचे कृपेकटाक्षेकडून सुखरूप असो विशेष विज्ञप्ति ऐसीजे. सेवेसी येऊस बारा महिन्यांत रोजमरा एक रुपये २०० दोनसे सरकारातून पावलेत. बाकी दीड हजार रुपये लोकांचे कर्ज घेऊन कालक्षेप केला. त्याचे देणे गुंतामुळे खासी स्वारी बरोबरहि येणे न जाले. श्रीमंत राउ साहेबाची स्वारी निघोन गेली, त्या समागमेंहि जाणे न जाले. कर्जदाराचे तगादामुळे पुण्यातच फसून बसलों आहो. येथें तर कोन्ही मायेच स्नेही कोन्ही नाहीं. स्वामीचे पायाखेरीज आणि उपाय नाहीं. स्वामी धणी समर्थ आहेत. कृपा केलिया आबरू राहत आहे; नाहीतर स्वामीचे शेवेसी अंतरतो. घरसंवसारातूनहि जातों. वीस बावीस वर्षे सेवा करून स्वामीचे पायांखेरीज एक पैसा घरीं व येथें कर्जाशिवाय असला तर शिवनिर्माल्य असे. मिथ्या विनंती सेवेसी असली तर आपले कुलस्वामिनीची सपत असे. त्यासी विज्ञप्ति ऐसीजे. एक पत्र रा॥ नाना फडनीस यांसी कृपा करून पाठविलें पाहिजे कीं पुण्यांत राघो निळकंठ यांसी कर्जदारराणी अडविलें आहे; तर त्यासी ताकीद करणे कीं तुमचा कर्ज देणे आहे तर आतां माईलेणी कोठून द्यावें? सोयेणे तजवीज करून देतील ऐसी कर्जदारास ताकीद करून माईलेस हजूर रा करणे, ऐसी आज्ञापत्र व रा॥ बाळाजी गोविंद यांसीं ताकीदपत्र कीं तुम्हाकडे सरकारची वरात एक हजार तीस रुपयाची माईलेची असून तुम्ही आपले हजार रुपयेचा तगादा करता तर हे गोष्ट कारियाची नाहीं. सरकारची वरात तुमचे नावी आहे ते माईले नावी खर्च लिहून माईलेपासून हजार रुपयेचा रोखा लिहून घेतला आहे तो माघारे देणे; येविसई स्वामीही ताकीदपत्र द्यावयाची आज्ञा रा॥ कुकाजी सिवरायासी आज्ञा केली; परंतु हस्तगत न जाली. त्यासी आतां हे ताकीदपत्र व रा॥ नाना फडनीस यांसी पत्र ऐसी दोन पत्रे कृपा करून पाठविलें पाहिजे म्हणजे येथील निकाल पाडून सेवेसी येईन. नाहीतर स्वामीचे पायाखेरीज मुरबी वसिला दुसरा कोन्ही नाहीं. स्वामीचे पाय अंतरतात. संवसारातून गेलो. पुढें स्वामी धनी समर्थ आहेत. यानंतर हिंदुस्थान प्रांतीचे वर्तमान श्रीकासीहून कर्जदाराची कासीद जोडी येक महिना पांचा रोजाची आली. पत्रांत वर्तमान लिहिले होते कीं जाफर महंमदखान सुबा बंगालाचा, त्याची फौज व फिरंगी व प्यादे तेलंगी वगैरे मिळोन विशेक हजार पटणाहून अलीकडे पंनास कोस श्रीकासीहून पंचवीस तीस कोस मोहणीया जागा आहे तेथें पडली आहे. मीरकासम अलीखान सुभा बंगालाचा होता तो पलोन सुजावदौला व अली गोहर याजपासीं आला. जगतसेटाचे दोघे पुत्र कैदीत घेऊन आला. दोन हजार स्वार, च्यारपांच हजार प्यादा तेलंगी, हजार फिरंगी, ऐशी फौज व दाहा करोडाची मालियत घेऊन आला आहे कीं वजीर व पातसाह यांची व याचे मारफत राा मल्हारराऊ होळकर व सिंदे वगैरे फौज दक्षणियांची करारमदार करून तिकडे घेऊन जाऊन मीरजाफर अलीखानाचे पारपत्य करून बंगालाचा बंदोबस्त करावा या येराद्यावर कासम अलीखान वजीराकडे आला आहे. त्यासी तूर्त बुंदेला अनुपगीर गोसावी दि॥ वजीर याणी लुटून घेतले होते म्हणोन बुंदेले याचे पारपत्याकरितां अलीगोहर व वजीर, व कासमअलीखान ऐसे मळोन कालंजरगडास येऊन मोरचे लाविलेत. बुंदेलाचे मुलकांत मोगलाई अमल बसविला. फौज तीस चाळीस हजार आहे. बुंदेले फार दिक जाले आहेत. मामलत चुकवितील. इजतखान वगैरे यांचीं लिहिलीं नवाब मजकुरास जात असतात याप्राा वर्तमान आले होते ते सेवेसी विनंती लिहिली आहे. सेवकाविसई दोन पत्रे राजश्री नाना फडनीस व राजश्री बाळाजी गोविंद यासी अगत्य कृपा करून पाठविले पाहिजे. बहुत काय लिहिने हे विज्ञाप्ति.