Selections from the Peshwa Daftar 29.53: [15-3-1764] Sakhubai Sindia, wife of Jayapa Sindia, complains to Raghunathrao against the ill-treatment of Mahadaji Sindia and pathetically appeals to Raghoba Dada for help.
Selections from the Peshwa Daftar 29.53
- Language
- Marathi
29.53
छ १६ रमजान
श्रीमंत राजश्री दादासाहेबांचे सेवेसी
प्रतिपूर्वक संखूबाई सिंदे दंडवत विज्ञापना. येथील कुशल ताा फाल्गुण सुध्य १२ जाणून यथास्थित असे. याउपरी चिरंजीव माहादजी सिंदे यासी आपण येथे पाठविले. साहेबीं पाठविले म्हणून आम्हीं त्यासी कोणे गोष्टीचे द्वैत न धरिता त्याचे (लोका)स व त्यास वाडियातच ठेविले. दोन तीन महिने आम्हापासी होते. सांप्रत्य कजिया करून दुसऱ्या वाडियात जाऊन राहिले. आम्हास अनेक प्रकारचे उपद्रव अरंभिला आहे. चहूकडोन बैतंग केले आहे. आमच्या जबलील माणूस देखील आम्हापासी येऊ देत नाहीं. सेतेपोते आमच्या पोटापाण्याची होती ते झाडून बंद केली. ब्राम्हण येक दोघे जवळ होते त्यासी पीडा करितात. आमची अन्नावस्त्राची विपत्ये आहे. आणखी उपद्रव आम्ही कोठेवर ल्याहावे ? आम्हावर ईश्वर गहजब केला कीं येकायेकी येकदाच मृत्य पावले. आम्हास कोठे उभे राहावयासी जागा नाहींसी जाली. दुखाचे परवत जालें असता माहदजी सिंदे पाठी लागले आहेत. येक खावंदाचा भरोसा, त्यासी साहेबहि परामृश (घेत) नाहींत. यैशा मणुशाकडून आमची आबरू घेवितात तेव्हा आम्ही उपाय काय करावा ? साहेबापासी वर्तमान ल्याहावयासी चोर जालो यैशा गती जाल्या आहेत. दासीचे दासत्व आम्ही करावे यैसे साहेबाच्या मर्जीस येत असले तरी सुखरूप करावें; परंतु ईश्वरास ह्या गोष्टी मानत नाहींत. साहेबाच्या चित्तात आमची विपत्ये करावी यैसे असले तरी तैसेच लिहून पाठवावें. विश भक्षून सर्वत्र प्राणत्याग करू. दुसरा उपाय नाहीं. हे जाचणूक आमच्याने सोसवत नाहीं. दौलत साहेबी त्याच्या हवाली केली. आज च्यार महिने येथे येऊन बसले आहेत. येक राऊत आद्यापि ठेविला नाहीं. पागेची बंदोबस्ती आगर शागीर्द (ये) कोणे गोष्टीची तरतूद तिलमात्र नाहीं. सारा बखेड़ा चहूकडोन जाला आहे. कोणी पाठऊन परामर्श करावा. पुढें आमच्या संसाराचा कांहीं बंदोबस्त करून देतील तरी आमची जगणूक होईल. माहदाजी सिंदे याच्या जाचणुकेपासोन सोडवावें. बहुत काये लिहिणे हे विज्ञाप्ति.
[१ जयाप्पा सिंद्याची स्त्री सखूबाई रघुनाथरावदादाकडे महादजीबद्दल तक्रार करिते. हिचा मुकाम बहुधा जांबगांवास असावा.]