Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.54: [31-3-1764] Purushottam Mahadev Hingne is sent on an embassy to the Abdali. The letter is addressed by Raghunathrao to Nana Fadnis.

Selections from the Peshwa Daftar 29.54

Language
Marathi

29.54

पौ छ ६ सवाल सन

आर्बा चैत्र

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री

बालाजी जनार्दन स्वामी गोसावी यांसी

पौ रघुनाथ बाजीराव नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत जाणे विशेष. राजश्री पुरुषोत्तम माहादेव वकील याची रवानगी शाहा अब-

१ घाबरे.

4170 दली याजकडे व जवाहिरसिंग जाटाकडे केली असे. त्यास वस्त्रं बहुमान न्यावयास येणेप्रमाणे पोशाख

वस्त्रे सिरस्तेप्रमाणे पोशाख

३ शाहा अबदली

२ खाशास

१ शाहावलीखान

३ जाटास

२ खास बंधु

१ रूपराम कटोर यास सनगे २ यां

---

३

---

६

हती नग

२ शाहा अबदली

१ खासा

१ शाहावलीखान

---

२

१ जवाहिरसिंग यांस

---

३

येकूण साहा पोशाख सिरस्तेप्रमाणे व तीन हत्ती देविले असत. तर सदरहू-प्रमाणे याचे स्वाधीन करून याची रवानगी लवकर करणं. रा। छ २७ रमजान सुरू अर्बा सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे हे विनंती.