Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.55: [Apr. 1764] Letter reporting news to the Peshwa from the North. The Jats with the help of the Sikhs are holding out against Najib. Mir Kasim is marching back upon Patna with his new allies, Shuja-ud-daula and the Emperor. The Abdali has withdrawn from the Punjab owing to risings in his own country.

Selections from the Peshwa Daftar 29.55

Language
Marathi

29.55

२

श्री

पुरवणी साहेबाचे शेवेसीं

हेमराज कवेर याचे पुत्र परसुकजी याजलाहि पाठविले. त्याजला हलचंद दिवान याचे कबिल्याविषयीं सांगितले. त्याजवरून कबिले जोहारमल जाट यानी सोडून दिल्हे. राज्यापासी पाठविले. ते जयेपुरास दाखल जाले. हलचंद याचे पुत्र चौघे याची मुलाजमत हुजूर जाली. कामकाज त्याजवरी आहे. राजे माधोसिंगजी बहुत सावधानीनें तरतुदीनें चालत आहे. सिकार बहुत खेळतात. स्वारी नित्या होत आहे. जाटाची नजीबखान रोहिले याची लढाई जाली. यावरी नजीबखानाकडे बहुत नवाजीस सिष्टाचार देऊन मुनसी रामकिसन याजला

[4171]

Ca 73-7 पाठविले होते. ते दिलीपलीकडे जाऊन रामघ्याचे घाटीं नबाब नजीबखान यासी मुलाजमत घेऊन सिरपाव घोडे बक्षीस मोत्याची माला सिरपेच जो सरंजाम दिल्हा होता तो प्रविष्ट करून बहुत स्नेहवाद संपादून दहा पांच दिवस राहून मुनसी रामकिसन याचा बहुत सिष्टाचार वस्त्रे बहुमान घोडा देऊन बिदा केले. ते चैत्र शु॥ ३ जयेपुरास दाखल जाले. राज्याची मुलाजमत जाली. नजीबखानासी आंत्र बहुत ममतेनें राखिले आहे. सिखाचा उपद्रव दिलीपलीकडे बहुत जाला. याजकरितां नजीबखान यांनीं जाटाकडील मनसुबा सोडून सिखाकडे जाऊन पैगाम लाऊन अक्रा लक्ष रुपये मामलीतीचे ठराऊन सला मामला करून उपद्रव मिटविला. सीख माघारे गेले. जाटाचा उपर सिखानीं बहुत केला. मुलुक वाचविला. नजीबखान रामघ्याचे घाटीं आहे. दिलीस येणार. जाट जोहारमल मथुरेस आहे. फौज पार पाठविली आहे. त्यांनीं तमाम आपल्या मुलकाची ठाणी कायेम केली. नजीबखानाची फौज वान्हा (?) कड उतरली होती, ते मारोन घेतली. जाटाचा बंदोबस्त जाला. पुढें जो विचार होईल ते लिहीत असो. दिलीस पातशाहजादा नजीबखानाचा पुत्र आहे. बंदोबस्त उत्तम आहे. पठाण आबदाली माघारे गेला. आपल्यामध्यें फिसाद फार जाला याजकरितां उठोन गेले. सिखाचाहि दबाव पडला. सिखानीं लाहोरांत ठाने बसविले. तमाम बंदोबस्त सिखाचा जाला. आलीगोहर पातशाहाकडील वर्तमान तरी पातशहा व सुजावतदौले काशीसंनिध पावले, पटण्यास जात आहे, तिकडील मनसुबा पडला आहे. कासमआलीखान बराबर आहे. त्याचा बंदोबस्त करून घ्यावा, हा विचार आहे. प्रस्तुत काशीसंनिध आहेत. पुढें जे वर्तमान येईल, ते साहेबाचे सेवेसी लिहीत असो. वरकड राजेरजवाडे आपल्या आपल्या जागाच आहेत. गुलराज वकील व नंदराम मुनसी शाहकडील कोठ्यात होते ते सांप्रत जयेपुरास दाखल जाले. राजे माधोसिंगजी याची मुलाजमत जाली. प्रस्तुत राहतील. हवेली (अपूर्ण) -

Discussed in (1)