Selections from the Peshwa Daftar 29.56: [12-6-1759] The writer asks for the immediate despatch of contingents to retain Meerut and other places captured recently.
Selections from the Peshwa Daftar 29.56
- Language
- Marathi
29.56
वडिलांचे सेवेसी सा नमस्कार विज्ञापना. ता छ १५ शौवाल मंगळवार दीड प्रहर दिवस सकाळचा मुकाम मेरठे सुखी असो विशेष. शुकृतालचे पत्र आले ते बजिनस पाठविले आहे. पावेल. रा॥ बाबास पत्र लिा आहे. विचारास आल्या द्यावे. सारांश फौजांचे पुढे कूच होऊन आल्यास आमचा येथील बंदोबस्त राहेल; आणि इकडे फौज पाठवावयाची ते पाठवावी. वारंवार काय लिहू, होणे जाणे ईश्वराधीन. आम्ही आल्यापासून लिहिता थकलो; परंतु कोणी एक स्वार मागाहून येक म्हणतो. सेयाजी गाईकवाड पालखीसुधा काल आले दुसरे कोणी आले नाही; तरी पतके फौजे पाठवावी; व फौजाचे कूच लौवकर होये ते करावे तरच इकडील ठाणी वाचतील, नाही तर कलतच आहे. हालीमाजीचा समये, कितीक गोष्टी ध्याना आणौन दादास विनंती व रावजीस करणे ते करावी. फार काय लिहू. बहुत काय लिहिणे हे विज्ञापना.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English