Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.57: [29-4-1767] An incomplete letter from Govind Raghunath to Vishwasrao Lakshman (Raosaheb) reports that an agreement has not yet been reached about the succession to the Holkar's estates. The writer further informs that the Jats have been joined by the Rohillas and have captured several outposts near Gwalior.

Selections from the Peshwa Daftar 29.57

Language
Marathi

29.57

पौ छ १० जिल्हेज

श्री

श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामी चे सेवेसी

विनंती सेवक गोविंद रघुनाथ सां॥ नमस्कार विज्ञापना. येथील कुशल वैशाख शुध १ बुधवार मुा ना झोकर जाणून स्वकीय लेखन करीत असिले पाहिजे विशेष. छ १९ जिलकादचे पत्रे पाठविली ते पावून वर्तमान विदित जाहले. रा॥ रावजीची पत्रे रावजीस दिल्ही. त्यांनी उतर केले की, येकदा फडनिसाची पत्रे सालसीची आल्या मग सर्व जाबसाल श्रीमंत दादासाहेबापासी करीन. दिकत कारकुनाची काढडीतात. आमच्या मर्जीप्रा वर्तत नाहीत याजकरिता विनंती लिहीत गेलो. दुसरे वडिलांनी पत्र लिहिले त्याचा भावगर्भ ध्यानास आणून जपत उतम. त्याप्रा उतर ल्याहावे. पत्रे परभारा न पाठवावी. आम्हापासी पाठवीत जावी. चिंता नाही. मधे त्याजपासी आज्ञा मागितली परंतु न दिल्ही. उतमच जाहले. दाहा हजार रुाची हुंडी पाठवणे म्हणून लिहिले. त्यासी रा॥ यादवरावभाऊनी बारा हजार रुाची निशा रा॥ गंगाधरपंत याची करून

* * * रावजीस पाठविले. बहुत उतम जाहले. कारकुनाची पत्रे जरूर पाठवावी. राजकी वर्तमान होलकंराचा श्रीमंता(चा) अद्यापि तह ठरला नाही. दादासाहेबाचा आग्रह नवी जाहगीर घ्यावी शिवाय नजर घ्यावी. त्याचे मानस पंचवीस लाख रुा पावेतो नजर कबूल करितात परंतु जाहगीर न

४173 देऊं. नित्य जाबसाल होतात. राा अवचितरावहि त्यांत आहेत. होळकराचा ठराव जाहाला म्हणजे होळकराची व सिंदे याची रवाणगी हिंदुस्तानात होणार आहे. भोसल्यासहि पाठविणार. काय ठराव होईल तो पाहावा. राा विठल सिवदेव याची पत्र नित्य श्रीमंतास येतात कीं, जाटाची फौज व रोहिल मिळोन दाहा पंधरा हजार भिंड कछवाधार येथे आली. गोसावी पलोन गेला. राा बालाजी गोविंद डंढाईत गेले. कोचेस फौज येणार. जर मातबर फौज येती तर मुलूक राहातो. नाहीं तर जाट, रोहिले एकत्र होऊन मुलूक घ्यावा जैसे त्याचे मानस जैसी वार्ता आहे. त्यासी लोक श्रीमंताच्या कह्यात नाहींत. सरदार मात्र बेदील. आम्हास मोठी आपली चिंता. कुटुंब समागमे आहे. आपण बहुत सावधता राखावी. आम्हास खर्चास राा गोपाळराव यानी लिहिले कीं हुंडी करून पाठविली ते घेणे. पत्रीमात्र लिहिले. हुंडी नाहीं. येक रुा नाहीं. जैसे लटके लिहिल्याने आमचे कैसे चालेल ? आमची येथीलच निश्वंति नाहीं. तेव्हां घरचा प्रकार काय ल्याहावा ? तथापि स्वामीस न ल्याहावे तर कोन्हास ल्याहावे ? अंगीकाराचा अभिमान धरून सांभाल करावा. हाहि प्रकार न लिहितो. म्या सर्व वर्तमान सेवेसी येक दोनदा निवेदन केले होते. इतके लिहिले म्हणून राग न करावा. धनी मायबापसारखा आहे म्हणून लिा. आपली आज्ञा कीं, मजला लिहिल्यावाचून स्मरण होत नाही. याजकरिता येक दोनदा लिहीत गेलो. आता लिहिणार नाही. वरचेवर आपल्याकडील वर्तमान लिहीत जाणे. आपण येक डौलें पुढील कमाविसीचे दुसरे मख्ताचे (अपूर्ण. दोन बंद गाहाळ)