Selections from the Peshwa Daftar 29.58: [Recd. 10-5-1764 ?] News-letter giving tidings to Raghunathrao about the progress of events at the court of the Nizam and news about the Rohilla, the Jats, and others.
Selections from the Peshwa Daftar 29.58
- Language
- Marathi
29.58
पौा छ ८ जिलकाद
[seal: श्रीभवानीशंकर]
श्रीमंत राजश्री दादा साहेब
स्वामीजीचे सेवेसी
सेवक गोविंद यादव दोन्ही कर जोडून सिरसाष्टांग नमस्कार विज्ञाप्ति जैसी जे. स्वामीनी कृपाळु होऊन पत्र पाठविलें तें पावून वाचून बहुत संतोषातें पावलों.
[१ शिक्याचा कागद.]
[117-1]
तें पत्र बजिनस नवाब दरगाहकुलीखानास वाचून दाखविलें व नवाब दरगाहकुलीखानानी पुसलें कीं आम्हांस पत्र लिहिलें कीं नाहीं ? आम्ही उत्तर दिल्हे मागून पत्र येणार. दरगाहकुलीखानाची ममता साहेबाचेठायीं फार आहे.
जगजीवनराऊ पोवार याजला पांच लक्षा रुपयाची जागीर दिल्ही. याचा दिवान आपाजीपंत नासिककर ग्रहस्त आहे व येक साहुकार यैसे आले आहेत. आमील धुंडितात. कोन्ही परगणे कबूल करीत नाहीं. बदमामली दुसरे तुम्हांकडील संसथे याकरितां रीघ (?) करीत नाहीं. आमाजी परगणे देतात परगणेची यादी लिा पाा.
सदाशिव रामचंद्र धारूरावर व हैदरयारखाहि समागमेच आहे. बापूजी करंड्याची फौज मधें पडली होती, याकरितां पुढें गेले नाहीं. धारूरीहून सदाशिव रामचंद्रानें निजामआलीस आर्जी लिहून पाठविली. मदत पाठविता तर लस्करास पोहाचणें होतें.
लस्करांतून लटकी वार्ता आली कीं मुरादखानास बसविले. निजाम आलीखान बेदरच्या किल्यांत गेला तेव्हां नवावाचे समागमे मुरादखान वगैरे लहान मोठे सरदार गेले. सर्व सरदारांस रजा देऊन येकला महमद मुरादखानास नवावानीं आपल्यापासीं ठेविलें. त्यावरून लोकांनीं हें तुफान रचिलें. हे गोष्ट नवाबाचे कानीं गेलीं. दुसरे दिवशीं नवाब व मुरादखा येके हवद्यांत बसून किल्यांतून लस्करास दाखल जाले. तेंच फरमाविलें मुरादखानास कीं दाहा बारा हजार स्वार व बाण व तोफा जानोजी व खंदारचा राजा वगैरे यांजला समागमें घेऊन जाऊन बापूजी करांड्यास तंबी पोहचाऊन सदाशिव रामचंद्रास घेऊन येणें. हुकूम निघतांच मुरादखानानें सांगितल्याप्रमाणें सरंजाम घेऊन रातोरात चालून करांड्यावर छापा घातला. दोन हजार स्वारानसी करांड्या पळाला. वराडाकडे गेला. मुरादखान रेणापुरावर आहे. सदाशिव रामचंद्र मुरादखां भेटले; कळले पाहिजे. निजामआलीचा रूख पहिला जानोजी भोसल्याकडे जायाचा होता. जानोजी भोसल्यानें आपला वकील पाठऊन जवाब सवाल केला, कांहीं पैकाहि देऊं केला, आंतस्त येक आहे. जानोजीविशईं रामचंद्र जाधव जवाबसाल केला. कितीक वर्तमान येसू जुबानी सांगतां कलो येईल. जानाजी भोसल्याचा इतबोर न धरणें.
निजाम आलीखानापासीं वकील हैदरनायेकाचा दुसरा आला कीं माझी मदत करा, खरचायास मी देतों. हैदरनायेकाकडे जायाचा रूख आहे. नवाब कलबुर्गाकडे आहे. जनवार्ता आहे कीं आदोनी रायचुरास जातो, मोगल आपले काबूंत आहे. छावणीची वार्ता आहे कीं धारुरावर करावी. सर्वांचा मनसुबा हाच आहे.
[१ विश्वास.]
अबदालीच्या लष्करांत बहुत महर्गता, खर्चायास नाहीं. आपल्याआपल्यात कजिया जाला. अबदाली जिवंत आहे. फौज थोडीसी, आंगचा जोरा फार; हार येऊं सकना. तो आपल्या मुलकाकडे गेला.
रोहिल्यासी व जाटासी कजिया होता, नजिबखानानें जाटास सांगून पाठविले कीं जे होणार तें जालें; तुझा बाप युद्ध केल्यानें जिवंत होत असला तर युद्ध आम्हांसी कर. तुझा कांही मुलूक घेतला नाहीं; उगाच कां हैराण होतोस ? येश अपेश भगवानाचे हातीं आहे, इतकी गो(ष्ट) बोलून नजिबखा जमना उतरून पलीकडे आहे. जाटासी चौघाही समजाऊन कागदीपत्रीं येक जाले.
राजे माधोसिंग आपल्या मुलकांत आहेत. जाटाकडेहि फौज पा॥ रोहिल्याकडे फौज पाठविली. हा दुतरफा आहे.
मल्हारजी होळकर * * आहे जैरामपंत वकील शहरांस हिंमतखांपासी आला भेट घेऊन तो नवाबाचे लष्करास गेला. येसू जासूद जुबानी सांगतां कलों येईल. जेरामपंतासी बहुत घरोबा आहे कळावे.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English