Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.59: [20-5-1764 ?] Chimabai, mother of Mahadaji Sindia, requests Raghoba to assign a Jagir for her residence and maintenance.

Selections from the Peshwa Daftar 29.59

Language
Marathi

29.59

श्री

श्रीमंत माहाराज राजश्री दादासाहेब

साहेबांचे सेवेसी

चरणरज चिमाबाई सिंदे साष्टांग दंडवत. अर्ज विनंती विज्ञापना. येथील कुशल तागाईत छ १९ रोज माहे जिलकाद जाणून स्वकीये कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे विशेष. आपण चिरंजीव माधवराव शिंदे याजला वाटें लावावयाबद्दल गंगातीरपावेतों गेलों. गंगास्नान करून माघारें साहेबाचे पायांपाशीं यावें ऐसा आपला मनोदये होताच, तों आपलीं पत्रें चिरंजिवास आलीं कीं, मातोश्रीस समागमे घेऊन न जावे म्हणवून आज्ञा. त्याजवरून चिरंजिवास हिंदुस्थानाकडे वाटे लाऊन आपन परगणे अंबड येथील मुकामीहून स्वार होऊन, छ १७ रोज माहे जिलकाद वैशाख वद्य ५ शेनवारी श्रीगोंदास येऊन दाखल जालों; साहेबास श्रुत्ये व्हावें. पुढें आपले खर्चावेचाची वगैरे राहावयाची बंदोबस्ती जैशी साहेब करून देतील त्याजप्रमाणे वर्तणूक केली जाईल. आपल्यांस राहावयासी स्थल कोनते नेमून द्यावयाचें तें कृपा करून नेमून द्यावें; व राजश्री अवचितराव तेहि तेथें आहेत तरी साहेबीं आमची खर्चवेचाची व राहावयाची बं(दोब)स्ती करून द्यावी. आणि राजश्री अवचितराव त्यासी चिरंजिवाकडे कृपा करून सत्वर वाटें लावावें. सदैव पत्र पाठऊन सांभाळीत असावें. पेडगावची सनद आपलें नांवाचीं कृपा करून तेवढी पाठऊन द्यावी. आपणांस साहेबाचे पायांशिवाय जोड काय आहे? आपण सर्वप्रकारें येकनिष्ठ साहेबांचे पायांपाशीं आहेत, साहेबीं कृपावृद्धि करावी. विशेष काय लिहिणें हें विज्ञापना.