Selections from the Peshwa Daftar 29.60: [7-9-1755] Vithal Shivdev reports to the Peshwa the details of his victory, despite heavy odds, over Bhimsing Jat. The concluding portion of this letter is printed as No. 45 of Selection 2.
Selections from the Peshwa Daftar 29.60
- Language
- Marathi
29.60
श्री
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वा-
मीचे सेवेसी
विनंती सेवक विठल सिवदेव कृतानेक सां नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ २९ जिलकाद मु॥ लालेर नजीक जिगनी प्रा॥ गालेर येथे स्वामीचे कृपेकरून सुखरूप असो विशेष. पूर्वी स्वामीस पत्रे लिहिली की, राणा भिमसिंग जाठ गोहदकर याणे हरामखोरी करून आमचे गालेरचे मोरचे उठऊन दिल्हे आणि किला घेतला. आम्हाजवळ फौज नाही. दिलीस फौज अटकली. रांगडे सामान मेलऊन किला जेर केला. गडावर अन्न नव्हते. येका दो रोजात किला येणार, पेगाम आले तों जाटाने लबाडी केली. त्याजवर त्याचे अमचे जुंज जाले. पहिलियाने त्यास मोडून शहरात घातले. दुसरे वेलेस आम्ही युद्धास गेलो तो रांगडे सामान पलोन गेले. त्याजवल अग्नीचे बल रेकले जेजाला फार, याजमुळे आमची फौज निघाली. हे वर्तमान सेवेसी लिहिलेच होते. त्यासी आम्ही अंत्रीत येऊन राहिलो. सर्व जमीदार कुल फिरले.
4177 ठाण्यास आमच्या लागोन दोन ठाणी घेतली. अवघा मुलूकच फिरला. आमची कुमक कोणी केली नाही. आमची फौज श्रीमंत राजश्री दादासाहेबाजवल, आम्हाजवल पाच सातसे स्वार. त्यास सिरा माणूस कुल जाया जाले. घोडी से पनास पडली. माणूसहि खासे खासे ठार जाले. कोणी धर न धरी. जाठाने तो फार शोकी केली. जिंगणीचे ठाण्यास मोरचे लाविले त्यास नवी सिबंदी ठेऊन मोरचे मारून काढले. त्याजवर जाठाने सुरजमल त्याजकडे आपला फतेसिंग पाठऊन तेथून कुमक पाचसे स्वार, दोन हजार प्यादा पाठविला. त्यास मांगती ठाणी घ्यावयास उदेग जाटाने केला. आम्ही फौज पाठविली. गोविंदराव सिवदेव याजबा हजार स्वार दोन तीन हजार प्यादा नवी सिबंदी ठेऊन रवाना केले. परंतु बारा हजार बंदूक, तीन हजार स्वार, परंतु जाठ भारी. त्यास आम्ही अंत्रीहून कूच करून आलो. गोविंदरायाजवलचे सामान व आपले सामान एकत्र करून बढोखेरावर (?) गेलो. त्याची फौज बढोखेरावर होती. त्यासी तेच दिवसीं आपल्यास काहिली जाली होती. फौजेचे युद्ध होऊ लागले. परंतु जाट भारी तेव्हां कुलस्वामीचे व स्वामीच्या चरणाचे स्मरण करून घोड्यावर बसलो आण तैसीच हला केली. त्याची फौज मोडून ताराज केली. रेकले दोन घेतले. घोडी दाहा वीस उंटे दाहा नगारा निशाण घेतले. सरदार फतेसिंग यास जिवे मारिले आण डोचके खिजमतगारापासून उरूब्रू कापविले. दोनतनिसे माणूस ठार केले. से दोनसे जखमी. फौज कु (अपूर्ण)