Selections from the Peshwa Daftar 29.61: [17-6-1764] Naro Shrinivas reports that the Jats have advanced as far as Ater and are threatening Konch.
Selections from the Peshwa Daftar 29.61
- Language
- Marathi
29.61
पो॥ छ मोहरम.
श्री
श्रीमंत राजश्री राऊ साहेबाचे सेवेसी
विनंती सेवेसी नारो श्रीनिवास कृतान्यक सिर साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ता॥ ज्येष्ठ सु॥ ४ मुा भांडेर जाणोन स्वकुशललेखनास आज्ञा झाली पाहिजे विशेष. येथील वर्तमान येसज. काल भिंडेहून माणूस आले ते सांगत होते की जाटाची फौज अटेरीजवल अकोडीस लागली आहे म्हणून सांगतो. दुसरे कोचेहून बेपारी आले ते सांगत होते की कोचेची पेट गडबडली आहे येस
4178 सांगत होता. सेवेसी कळावे. आमचे खासगी वर्तमान येथील मामलेदार निघून स्वामीपासी गेले म्हणून गावात गडबड जे, कोणी येथ नाही. आणि काही सिबंदीहि नाही. दुसरे अणियेक प्रकारे फिकीर करतात. सेवेसी कळावे. तरकारी डाली पाा आहे. विशेष लिहिणेस की नवे. सेवेसी श्रुत होय विज्ञापना.