Selections from the Peshwa Daftar 29.62: [2nd June 1764] Defying orders not to quit the capital Mahadji Sindia left Poona for his territories in Malwa. Naro Krishna Subhedar of Barhanpur instructs his officers as to how Mahadji Sindia's march into the North was to be circum-vented at various strategic points on the different routes he was likely to take.
Selections from the Peshwa Daftar 29.62
- Language
- Marathi
29.62
पौा छ ५ दोन प्रहर रात्र
मुा धामणगाव पाा मेहुणबारे
श्री
राजाश्रिया विराजित राजमान्य राजश्री
त्र्यंबक नारायण व अंबादास बलाल
स्वामींचे सेवेशी
सेवक नारो कृष्ण साष्टांग नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहावें विशेष. राजश्री माहादजी सिंदे याची सरदारी दूर करून मानाजी सिंदे याजकडे सांगितली, त्यामुलें श्रीमंताची आज्ञा न घेतां पळोन गेले, ते मजल दर मजल मालवियांत जातील, त्याचें पारपत्य जालें पाहिजे म्हणून रुबरू येविसी कितेक प्रकारें सांगितलें. त्यावरून हें पत्र तुम्हांस लिहिलें असे व आपले निसबत तैनाती पथकें आहेत त्या सरदाराचे नांवें सरकारचीं पत्रें अलादा आहेत ती पोा असेत. तुम्हीं व सर्वांनी येविसीचा अर्थ ध्यानांत आणून, रात्रीचा दिवस करून, माहादजी सिंदे यांचें पारपत्य करावें. हें पत्र पावतांच मार्गाची बंदोबस्ती मेहेनत करून करावी. ही वेळ स्वामिकार्याची मेहनत करून करावयाची आहे. येक घटकेचा विलंब, हरयेक सावधता करावयाचा नव्हे. तापीस पाणी असेल. ज्या ठिकाणी उतरावयाचा मार्ग असेल तेथें तरतूद करावी. तुम्ही सत्वर ब्रऱ्हाणपुरास जाऊन जागा जागा नांवा असतील त्या झाडून येके जागां गोला करून बंदोबस्तींत ठेवणें आणि नाकेबंदी करून सावध राहणें. हुजुरून राजश्री कुकाजी सिवराम रवाना जाले आहेत, ते तिकडे येतील. तुम्हांस येविसीं व हरयेक बंदोबस्ताविसीं लिहितील त्याप्रमाणें त्या घटकेस फौजसुधां तुम्ही जार्तींनसी जाऊन पोहचणें. ज्याप्रमाणें कामकाज सांगतील त्याप्रमाणें करावें. याजला यखादा दिवस अधिक उणा मार्गी लागलियास तुम्हांजवळ हे पत्रें अगोधर पावतींल. तुम्ही
Ca 73—8 खबरदारी चांगली करणें. तुम्हीं शाहाणे खबरदार आहां. खानदेशांत होलकराकडील जागाजागा कमाविसदार आहेत, त्यांजला पत्रें गेलीं आहेत. तुम्हीं सर्वास ताकीद करून साहेब नक्ष करणें. हे कार्य तुम्हीं कराल हा भरंवसा जाणोन आम्ही आलों नाहीं. सरकारचा शब्द आम्हांकडे न ये तें करावें. हरयेक ठिकाणी अडचणीची जागा पाहून त्या ठिकाणी गाठून पारपत्य करावें. मुख्य गोष्ट तापी उतरोन यावत जागा जागा नाकेबंदीचें काम पोख्त करून खबरदारी करणें. तुम्हीं तापी उतरून उत्तर तीरीं राहावें. चांगदेव वगैरे ठिकाणी नावा असतील त्या दरोबस्त येके जागा गोळा करून, तुम्हीं फौज सुधां, ज्या ठिकाणी उतरावयासी येतील, तेथें मुकाबलीयासी परतीरी उभें राहून ज्या ज्या ठिकाणी उतरावयाचा मनसुबा करितील त्या ठिकाणी तुम्हीं जावें. कदाचित वराडचा रोख त्याणी धरला तर तिकडे आडवें व्हावें. झाडून माहालोमाहालीं येविसींची ताकीद करून तुम्हीं खबर(दार) राहाणें. हे गोष्टीचे श्रीमंतास जरूर आहे. याजकरितां आम्हांस बहुत प्रकारें सांगितलें आहे कीं, जैसा प्रसंग पाहाल तसी तरतूद करून बंदोबस्त करणें, म्हणून आज्ञा केली आहे. मशारनिलेबराबर स्वार तीनसें आहेत. सरंजाम कमीच आहे. तुम्हीं हिंमत धरून सावधता केलियास हें यश तुमचें पदरीं पडेल दिसतें. थालनेर वगैरे होलकराकडील महालकरी यासी सरकारचीं पत्रें व आम्हीं पत्रें येथून परभारी पाठविलीं आहे. रनाल्याकडील तापी किनारियाचा बंदोबस्त माधवराव कदम यांस सोपिला आहे त्याप्रमाणे करितील. माहादजी सिंदे यांचा येक रोख कासारबारी उतरोन थालनेराकडे जावयाचा आहे. येक बुराणपुरासनिध होऊन जावें यैसे आहे. तुमचे लक्षातून चोपड्यापासून बराणपुरापावेतों, अटकाव कराल हा भरंवसा आहे. तें न जालें तरी नामोसी पुर्तेपणें आपले माथां येईल, यसें न करणें. थालनेराकडून जाऊं लागल्यास तुम्हीं परतीरानें त्यांचा होलकराकडील कमाविसदारांचा व बांड्याचा उपराला करणें. ऐसेंहि करितां येकादे जागा तापी उतरून पार जालें तर अशेरचे किल्यावरील लोक वगैरे व बराणपूरचे लोक व भिलाण आणून, धूलकोट वगैरे घाट व नाक्याचा बंदोबस्त करून, तेथें त्यांस आडवें होऊन, पारपत्य करणें. बहुत सावधता करून त्यांस तापीपार होऊं न दिलियास तुमचें ऊर्जित होईल. अंबादासपंत व तुम्हीं निराले असाल तर पत्र पावतांच येकवट होणें. एके घटकेची सुस्ती न करणें. बातनीस दाहा जोड्या व राऊत पाठवून बातनी वरचेवर आणवीत जाणें. त्यासुमारें बंदोबस्त यथास्थित करणें. माहालोमाहाल रोख्यावर राऊत गेले असतील
१ बाजू.
ते रातोरात जमा करून जथून राहणें. तिकडील वर्तमान दिनचर्येचें वरचेवरी लिहीत जाणें. इकडून पत्रें वरचेवर तुम्हांकडे पाठवीत जाऊं. बहुत काय लिहिणें लोभ असों दीजे हे विनंती.