Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.63: [1-7-1764] Vishvasrao Lakshman is informed that Chimanajipant is leading an expedition against the rebellious Bundelas.

Selections from the Peshwa Daftar 29.63

Language
Marathi

29.63

पौ॥ छ ५ मोहरम

श्री

श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसी

विनंती सेवक महादाजी विश्वनाथ सा॥ नमस्कार विज्ञापना. येथील क्षेम ता॥ छ १ मोहरम जाणोन स्वामीचे कृपेकरून यथास्थित असे विशेष. चिरंजीव राजश्री चिमणाजीपंत स्वारीस बुंधेल्याच्या पारपत्याकरिता आज च्यार दिवस नदीपार मुकाम करून राहिले आहेत. बुंधेल्यानी शोकी चहूकडून फारच केली आहे. धण्याच्या प्रतापेकरून बंदोबस्त होऊन येईल. यानंतरि इकडील सविस्तर वृत राजश्री महिपतराव सेवेसी निवेदन करितां सेवेसी श्रुत होईल. आपण स्वामीची सेवेसी श्रुत येकनिष्ठपणे जाणतो. दुसरा अर्थ जाणत नाही. सेवेसी श्रुत होये विज्ञाति.