Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.64: [4-7-1764] Naro Ballal reiterates his orders to intercept Mahadaji Sindia's march.

Selections from the Peshwa Daftar 29.64

Language
Marathi

29.64

पौ॥ छ १७ मोहरम

च्यार घटका दिवस

१ राहता.

श्री

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्रिंबक

नारायेण व अंबादास बल्लाळ स्वामींचे सेवेसी

सेवक नारो कृष्ण साष्टांग नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीये लिहा विशेष. राजश्री माहादजी शिंदे श्रीमंताची आज्ञा न घेतां पळोन हिंदुस्थानांत चालले; त्याचें पारपत्य करावें म्हणोन आज्ञा जाली आहे. येविशीचा मजकूर तुम्हास सोमवारचे दोन प्रहर रात्रीस मुजरद जासूदजोडी दुसरें दिवशीं तुम्हाजवळ पोहोचावें असा करार करून रवाना केलें तीं पत्रें पावून त्यांप्रमाणें बंदोबस्त केलाच असेल. शिंद्याचा मुकाम सो(म)वारीं निफाडेजवळ होता. काल मंगळवारीं बारीखाली मुक्काम जाला. येथून श्रीमंतांनीं त्याजकडे भानगडी करितां पाा होतें, त्याची त्याची भेट जाली; न आइकत. निघोन मजल दरमजल चालले. गृहस्थ फिरोन श्रीमंताकडे आजच दोन प्रहरीं आले, त्यावरून हें पत्र जलद तुम्हाकडे पाठविले आहे. तुम्ही आपली फौज दरोबस्त येकें जागां करून तापी परतीरीं उत्तरेकडे गट करून झाडून नावा परतीरीं आडचणी जागा नेऊन नाकेबंदी चांगली करून ते ज्या ठिकाणीं तापी उतरावयासी येतील ते बातमी राखून मुकाबलिंयास उभे राहून काम साधावें. ही वेळ बहुत कामाची आहे. आपले सरदारांस हुजूरचीं पत्रें वगैरे निसबत * * * यांस पाा आहेत. मेहनत करावयाचा समय आहे, न चुकावें. बातमी राखून नदीस पाणी आलें आहे याजमुळे तुमचा डाव फांवेल ऐसें आहे; परंतु बातमी राखून मुकाबला तापी किनारियावर पाडला पाहिजे. निदान्नीं उतरू न पावत इतकें तर केलेंच पाहिजे. चोपडे बेटावदापासून माजरोदपर्यंत घाट नावा असतील तितक्या बंद करून उत्तरतीरीं तुम्ही फौजसुद्धां ते जिकडे उतरावयास जातील तेथें उभे राहून मुकाबला कराल म्हणजे उतरूं पावणार नाहींत. सांरांश विशेष लिहावेंसें नाहीं. हें काम गांठ पडून लांबत चाललें तर दाहापांच हजार रुपये शिबंदी खर्चहि पडल्यास करावा ऐशी श्रीमंतांची परवानगी आहे. जर हें गोष्टी कळेल तैसी तरतूद करून साधितां तर मोठा नक्ष आहे. माहादजी शिंदे याजबराबर सरंजाम थोडके पांचशें राऊत चांगले आहेत. दशाअवधान करून कार्य साधावयाचे प्रसंग आहे. माधवराव बांडे यांसहि थालनेराकडील मार्गास अवरोध करावयाविषयीं सरकारचीं व आमचीं पत्रें गेलीं आहेत. तिकडीलहि बातमी तुम्ही राखून होईल बंदोबस्त तो करावा. सारांश अकस्मात हें कार्य प्राप्त जालें आहे. याची सर्वसहा (?) जालियास फार कसबाची परीक्षा आणि पराक्रम आहे. नद्या भरल्या आहेत. याजमुळे उतरणार दोन सहस्त्र आणि बंद करणार दोनशें बराबर आहेत. तुम्ही पांचसातशें हजारपर्यंत समयास मिळवावें. साहेबकाम करून दाखवावें ऐसें आहे. बहुत लिहावें ऐसा पदार्थ नाहीं. पत्रदर्शनीं पेशजीच मुस्तेद होऊन त्याचे सुमारें बातमी राखून गेलेच असाल. तुमचा फौजेचा त्यास भ्रम फार आहे त्याजप्रमाणें दबावानेंच काम होईल. पोहचले

4182 मात्र पाहिजे. येदलाबादेस देखील नांवा वगैरे बंदोबस्त केला पाहिजे. तुम्हास सुचेल तें करणें. खाना छ ४ मोहरम बुधवार दीड प्रहर दिवस (दिवस) बहुत काय लिहिणें. लोभ असों दीजे हें विनंती.