Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.65: [19-7-1764] Orders issued to Manaji Sindia for the payment of ghasdana dues.

Selections from the Peshwa Daftar 29.65

Language
Marathi

29.65

छ २४ मोहरम

श्रीशंकर

यादीपत्र

१ मानाजी सिंदे यास पत्र की दत्ताजी सिंदे याचे कालकीर्दीचे मलका-

पुरचे घासदाण्याबा नारो शंकर याचे विद्येमानची चिठी

रू॥ ६५८१ पास्टश येक्यांयशींची आहे. येविशीं पेशजी महादजी सिंदे

याजकडे सरदारीचा कारभार होता. त्याजला पत्र दिल्हे होते. हली याजकडे

सरदारी जाली आहे. सबब माहादजी सिंदे याचे पत्राप्रमाणे याजला पत्र

द्यावयाची आज्ञा.

महादजी सिंदे याचे नांवे सरकारचे पत्र सोबत आहे त्याप्रमाणें मनाचिटी देणे

म्हणून पत्र.

१ माहादाजी गोविंद यास पत्र की मानाजी सिंदे यास पत्र आहे त्या

पत्राबमोजिब याची चिठी यास देणे म्हणून पत्र.

येणेप्रमाणे पत्र.

२

सदरहू प्रो येकूण दोन पत्रे.

छ १९ मोहरम आषाढ

खमस सितैन