Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.66: [4-8-1764] Kedarji Sindia informs Raghunathrao that whatever commands are to be communicated, should be delivered to Mahadji with whom the writer has no difference; since, he adds, Mahadji is with the addressee, there is no need of the writer's presence there.

Selections from the Peshwa Daftar 29.66

Language
Marathi

29.66

पो छ ५ सफर

श्रावण मास सन खमस

श्री

श्रीमंत राजश्री दादासाहेब

स्वामीचे सेवेसी.

विनंती सेवक केदारजी सिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. येथील सेवकाचें वृत तागायेत छ १ माहे मोहरम माहाराजांचे असीर्वादें यथास्थित असे विशेष.

4183 स्वामीचें आज्ञापत्र छ २ मोहरमचें आलें तें प्रविष्ट जाहालें; तेथें आज्ञा कीं, हुजूर दर्शनास येणे. हुजूर आलियावरी जो बंदोबस्त करणे तो केला जाईल म्हणून आज्ञा लिहिली. यैशास स्वामीचे सेवेंत तीर्थरूप राजश्री नानाबावा आलेच आहेत, त्यांसच जे महाराजांनी आज्ञा करणे ते केली पाहिजे. आम्हींहि त्यांचे आज्ञांकित असो. स्वामीच्या आज्ञेप्रमाणेच जे चाकरी करणे ते सर्वहि सेवा चाकरी करून. तीर्थरूपांत व सेवकांत कांहीं द्वैतार्थ न जाणावा. विदित जाहलें पाहिजे. सेवेसी ख्यात होये हे विज्ञाप्ति.