Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.67: [16-8-1764] Naro Ballal reports that Mahadaji Sindia eluded his attention by crossing the Tapte at the Maheshwar ford. He further refers to his difficulties in realizing revenue in Khandesh.

Selections from the Peshwa Daftar 29.67

Language
Marathi

29.67

पौ॥ छ २४ मोहरम

सन खमस.

श्रीमंत राजश्री दादासाहेब

स्वामीचे सेवेसी.

विनंती सेवक आज्ञाधारक नारो बलाल मुसकुटे कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. ता॥ छ १७ मोहरमपावेतो तालुके मजकूर व सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. यानंतर नारायेणजी मोरे याजबरोबर आज्ञापत्र रवानगी छ ४ रोजी जाले ते छ ९ मोहरमी दोहो प्रहर दिवस चढता पावले. तेथे आज्ञा की महादजी सिंदे येथून गेले आहेत. यासी बढव्याचे घाटे आले तरी नाव बंद करून उतरू न देणे, व ठाणेयाचा बंदोबस्त करणे. त्यावरून घाटाचा बंदोबस्त केला तो छ १३ मोहरमी महादजी सिंदे महेश्वरचे घाटे उतरोन पार जाले. कूच दरकूच महेश्वराहून उजनीस जातात. आपल्या घाटे आले नाही. इकडील वर्तमान तरी बढवेकर राजे याचा तूर्त लावणीचा हंगाम जाणोन सलुक केला आहे. सलुक न करावा तरी रयेतीस धीर पुरोन लावणी होत नाही. हे लावणीचे दिवस निघोन गेलियासीं पुढे महाल कमती बहुत येतो. पुढे निर्वाह करणार स्वामी धनी समर्थ आहेत. हांडे सरकारात खेमा गोंड याचे लेकाने ६३

लबाडी करून कसबे हांडे येथील गुरे नेली आहेत. त्याचे पारपत्य केले पाहिजे. तिकडे आठा दिवसी जातो. पो खांडवे येथे रामपुरे व सक्राइकर व धारडी व सिलाणीकर मवास बहुत उपद्रव देतात याकरितां मवासाचे तोंडावरी तीन ठाणी मुस्तकीम ठेऊन मुलुकाचा बंदोबस्त करून लावणी केली आहे. ठाणेयामुळे सिवंदी जाजती लागली आहे. सरकारच नक्ष राखिला. पुढे निभाव करणार स्वामी समर्थ आहेत. यंदा या मुलकातून सटवाजी गाईकवाड नि॥ मल्हारराऊ होलकर याचा पथक्या गेला. त्याणे प्रगण्यात बहुत धामधूम केली. मागाहून सिंदे गेले त्याची पथके आजपावेतो जातच आहेत. धूम बहुत करितात. मनमानेसारिख्या भेटी वगैराये घेतात. त्यामुळे व मुलकात आरदानीमुळे बाकी रूपये वीस पंचवीस हजार वसूल करून साहुकाराचा येवज रसदेस वेतला आहे, त्याचा भरणा करणे आहे तो करून, सारे माहालचा हिशेब घेऊन भेटीस येतो. भेटीनंतर बढव्याचे राजियाचे सलुकाचे व मुलकाचे वर्तमान सविस्तर निवेदन करील. पुढे माझा निर्वाह करणार स्वामी समर्थ आहेत. नारायेणजी मोरे यासी सिंदे याचे बंदोबस्ताकरिता आजपावेतो ठेऊन घेतले होते. आज खाना केले असेत. इकडील सविस्तर वर्तमान निवेदन करितील. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.