Selections from the Peshwa Daftar 29.68: [22-8-1764?] Sakhubai Sindia to Raghunathrao reporting her safe arrival at Shrigonda.
Selections from the Peshwa Daftar 29.68
- Language
- Marathi
29.68
श्रीपांडुरंग
श्रीमंत राजश्री दादासाहेबाचे शेवेसी
आज्ञाधारक सखूबाई सिंदे दंडवत विज्ञापना तागाईत छ २३ सफरपर्यंत साहेबाचे कृपेकरून सेवकाचें वर्तमान यथास्तित असे विशेष. साहेबाची आज्ञा घेऊन स्वार जाहलो तो श्रीगोंद्यास दाखल जाहलों. धण्यांच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करितों. फौजेचे वगैरे कामकाज चाली लाविले आहेत. महाराजांच्या कृपेकरून सिधधीस जाईल. आम्हास सर्व गोष्टींनें लोभ करून उर्जित करणे त्याचा परिणाम खावंद लावितील हा पूर्ण भरवसा आहे. त्या अभयेकरून स्वस्थचित्ते वर्तणूक करितों. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.